पुण्यात पहायला मिळाले महाराष्ट्रातील बेरोजगारीचे भयाण वास्तव! IT कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी तब्बल 3000 इंजिनिअर रांगेत

पुण्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात  IT कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी तब्बल 3000 इंजिनियर रांगेत इभे असल्याचे दिसत आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jan 27, 2025, 06:57 PM IST
पुण्यात पहायला मिळाले महाराष्ट्रातील बेरोजगारीचे भयाण वास्तव! IT कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी तब्बल 3000 इंजिनिअर रांगेत  title=

IT Jobs in Pune : महाराष्ट्रातील बेरोजगारीचे भयाण वास्तव पुण्यात पहायला मिळाले आहे. पुण्यातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये  IT कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी 3000 इंजिनियर रांगेत थांबवल्याचे पहायला मिळाले.  मात्र, येथे किती जगांसाठी नोकरी होती हे पाहून धक्का बसेल. या व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर हजारो कमेंट आल्या आहेत.

आयटी हब अशी पुण्याची ओळख आहे. पुण्यात अनेक बड्या IT कंपन्या आहेत. महाराष्ट्रात बेरोजगारीची समस्या किती भीषण आहे हे पुण्यात पहायला मिळाले. पुण्यातील. मगरपट्टा भागात IT कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी तब्बल 3000 इंजिनियर रांगेत उभे होते. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओ शूट करणारे थकले पण रांग काही संपली नसल्याचे चित्र या व्हिडिओत पहायला मिळाले. 

मगरपट्टा भागात असलेल्या IT कंपनी डेव्हलपर पदासाठी 100 जणांची भरती केली जाणार होती. यासाठी कंपनीतर्फे वॉक-इन इंटरव्ह्युव्ह आयोजीत करण्यात आला होता. 100 जागांसाठी तब्बल 3 हजार तरुण हातात इंजिमियरींगची पदवी घेऊन उभे होते. यामुळे आयटी क्षेत्रात नोकरीसाठी किती मोठी स्पर्धा आहे देखील अधोरेखीत झाले आहे. आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांबाबतही लोकांनी चिंता व्यक्त केली आहे.

पुण्यातील हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हजारो लोकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. आपल्या देशात किती तरुण बेरोजगार आहेत हे या व्हिडिओमधून दिसत आहे अशा प्रकारच्या हजारो कमेंट अनेकांनी केल्या आहेत.