'मत्स्य शेतीतून रोजगार उभे करणार' झी 24 तासच्या उद्योग संमेलनात नितेश राणेंनी दिला शब्द

Nitesh Rane: जे खातं मला दिलंय त्यामाध्यमातून कोकणात चांगला विकास करण्याची संधी मला मिळाली असल्याचे नितेश राणे म्हणाले.

Pravin Dabholkar | Updated: Jan 27, 2025, 06:49 PM IST
'मत्स्य शेतीतून रोजगार उभे करणार' झी 24 तासच्या उद्योग संमेलनात नितेश राणेंनी दिला शब्द  title=
नितेश राणे

Nitesh Rane: कोकणचे सुपूत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नितेश राणे यांना मंत्रिमंडळ विस्तारात मत्स्य आणि बंदारे हे खाते देण्यात आले. यानंतर नितेश राणेंनी अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली आहे. झी 24 तासच्या उद्योग संमलेनात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्याला मिळालेल्या विभागाबद्दल भाष्य केले. तसेच आपल्या कार्यकाळात रोजगार निर्माण करणार असल्याचे आश्वासनही दिले.  

जे खातं मला दिलंय त्यामाध्यमातून कोकणात चांगला विकास करण्याची संधी मला मिळाली आहे. खूप वर्षानंतर दोन्ही खाती एकाच मंत्र्याला मिळाली आहेत. मासा हातात न घेणाऱ्या, न खालेल्या मंत्र्यांना आतापर्यंत हे पद मिळालंय. पण आम्हाला किनारपट्टीचा चांगला अभ्यास आहे. आपलं राज्य इतरांच्या तुलनेत पुढे जाण्यासाठी प्रयत्न असल्याचे मत्स्य आणि बंदारे मंत्री नितेश राणे म्हणाले. 

मत्स्य शेतीतून रोजगार कसा निर्माण होईल? यासाठी काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. तारापोवा मत्सालयावर काम सुरु आहे. पुण्यासारख्या भागात एक्वारियम उभे करु शकतो का? यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले. मत्स्य शेतीतून रोजगार उभे करणयासाठी यंत्रणेत शिस्त आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. काहींना सुतासारखे सरळ केले की बाकीचे सर्वजण चांगले काम करतील, असेही ते म्हणाले. वाढवण विकास बंदर प्रकल्प पंतप्रधानांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. 10-12 बैठका यावर झाल्यायत. यातील सगळ चोख नियोजन झालंय. राज्य, केंद्रीय खाते आम्ही एकमेकांच्या संपर्कात राहू. हे बंदर देशाच्या दृष्टीकोनातून गेमचेंजर ठरणार असल्याचे ते म्हणाले.  शिप ब्रेकींग हे गुजरात, कर्नाटकमध्ये होतं पण आपल्या राज्यात होत नाही. त्यासाठीही प्रयत्न सुरु असल्याचे नितेश राणे म्हणाले.