Border Gavaskar Trophy : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात पार पडलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील (Border Gavaskar Trophy) दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 10 विकेट्सने विजय मिळवला. मात्र या सामन्यापेक्षा जास्त चर्चा ही भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रेव्हिस हेड (Travis Head) यांच्यातील वादाची झाली. मैदानात दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली यावरून आता आयसीसी त्यांच्यावर मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे.
सिराज आणि हेड हे मैदानात एकमेकांशी भांडल्या प्रकरणी आयसीसीच्या आचारसंहितेनुसार दोषी आढळल्याचा दावा करण्यात ऑस्ट्रेलिया मीडियाकडून करण्यात आलेला आहे. यासाठी त्यांना शिक्षा मिळणार हे जवळपास निश्चित झालय. 'डेली टेलीग्राफ' आणि 'कोड स्पोर्ट्स' समवेत अनेक रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं गेलं आहे की सोमवारी अनुशासनात्मक सुनावणी झाल्यावर त्यांना दोषी ठरवण्यात येईल. क्रिकेटमध्ये दोघांचा रेकॉर्ड चांगला आहे तेव्हा यामुळे दोघांवर निलंबनाची कारवाई होणार नाही केवळ दंड भरावा लागू शकतो अशी माहिती देखील समोर येतेय.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना हा एडिलेड येथे झाला होता. या सामन्यात ट्रेव्हिस हेडने 140 धावा बनवल्या आणि सिराजने टाकलेल्या बॉलवर तो आउट झाला. यावेळी मैदानात दोन्ही खेळाडूंमध्ये वादावादी झाली. हेडने पत्रकार परिषदेत सांगितले की, त्याने सिराजच्या गोलंदाजीची प्रशंसा केली होती, मात्र सिराजने याचे खंडन केले आणि ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाने आपल्याशी चुकीचे वर्तन केल्याचे मुलाखतीत म्हटले. सिराज आणि हेडमध्ये झालेल्या या भांडणानंतर ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी सिराजला भर मैदानात हूटिंग केले.
हेही वाचा : KKR च्या सर्वात महागड्या खेळाडूच्या नावासमोर लागणार डॉक्टर! आयपीएलमध्ये 23.75 कोटींची लागली बोली
पर्थ येथील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान झालेला पहिला सामना जिंकून भारताने 1-0 अशी आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने 10 विकेट्सने जिंकून सीरिजमध्ये 1-1अशी बरोबरी साधली आहे. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या इनिंगमध्ये 19 धावांचं टार्गेट मिळालं होतं. यावेळी एकही विकेट न गमावता 22 धावा करून ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला.
पहिली टेस्ट: 22 ते 26 नोव्हेंबर
दुसरी टेस्ट: 6 ते 10 डिसेंबर
तिसरी टेस्ट: 14 ते 18 डिसेंबर
चौथी टेस्ट: 26 ते 30 डिसेंबर
पाचवी टेस्ट: 3 ते 7 जानेवारी