How To Protect Plants: आपल्या घरात छोटीशी बाग फुलवावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र बदलत्या काळानुसार घरांचा आकारही कमी होत गेला आहे. त्यामुळं बागेची जागा आता बाल्कनीतील कुंड्यांनी घेतली आहे. मात्र, फ्लॅटमध्ये बाग फुलवणे कठिण होऊन जाते. कारण झाडांसाठी खत आणि पाणी यासोबतच पुरेसा सूर्यप्रकाशदेखील गरजेचा असतो. सूर्यप्रकाश नसला तर झाडांची वाढ होत नाही. अशावेळी त्यांचे देखभाल करणे खूप कठिण होऊन जाते. पण आम्ही यावर एक उपाय शोधून काढला आहे. आज आम्ही तुम्हाला एक टिप सांगणार आहोत.
हल्ली इनडोअर प्लांटचा ट्रेंड वाढताना दिसत आहे. पण कधी कधी झाडांना मुंग्या, बुरशी आणि किडे लागतात. त्यामुळं झाडं खराब होतात. इतकंच नव्हे तर झाडांना कधी कधी फुलंदेखील लागत नाहीत. त्यामुळं आज आम्ही तुम्हाला तुरटीबाबत सांगणार आहोत. यामुळं झाडांच्या सर्व समस्या दूर होतील. तुरटीमुळं झाडांची चांगली वाढ होईल.
तुरटीचीही टिप्स लोकांना जरी चमत्कारिक वाटत असली तर झाडांसाठी फायदेशीर आहे. यात अॅल्युमिनियम, पोटेशियम सल्फेट झाडांच्या वाढीबरोबरच त्यांना मजबूत करतात. त्या व्यतिरिक्त किटकनाशक म्हणूनही काम करतात. झाडांत तुरटी टाकल्याने फुलंदेखील येतात. तुम्ही तीन प्रकारे तुरटी झाडांमध्ये टाकू शकता.
- झाडांमध्ये तुरटी टाकण्यासाठी तुम्ही या पर्यायाचा अवलंब करु शकता. सगळ्यात आधी एका पाण्यात तुरटीचे तुकडे टाता आणि एका चमच्याच्या मदतीने ढवळून घ्या. तुरटी विरघळली की एका स्प्रे बॉटलमध्ये टाकून तुम्ही ते झाडांवर मारू शकता. तुरटीचे पाणी टाकण्याच्या आधी माती थोडी सुकवून घ्या.
- जर तुम्हाला तुरटीचे पाणी बनवण्यासाठी वेळ मिळाला नाही तर तुम्ही थेट तुकडेच टाकू शकता. त्यासाठी तुरटीचे छोटे छोटे तुकडे करुन घ्या आणि मातीत ठेवा. फक्त तुकडे जास्त मोठे करु नका यामुळं मातीचं नुकसान होऊ शकते.
- झाडांना मुंग्या किंवा किडे लागल्यास तुम्ही तुरटीचा वापर करु शकता. त्यासाठी तुम्ही कुंड्यांच्या खालीदेखील तुरटी ठेवू शकता. यामुळं झाडांची वाढ होण्यास मदत होते आणि झाडांना किड्या-मुंग्यादेखील लागत नाहीत.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)