नागपूर : दुसरीकडे नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसनंही विधानभवनाच्या पाय-यांवर आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेसने ही निदर्शने केलीत.पहिले तीन दिवस विरोधकांच्या गोंधळामुळे कामकाज होऊ शकलं नाही. तर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची अनुपस्थिती आणि काँग्रेस आमदारांनी कामकाजावर टाकलेला बहिष्कार त्यामुळे सत्ताधारी पक्षाने विरोधकांशिवाय कामकाज रेटून नेले.
आज पुन्हा शेतक-यांचे प्रश्न आणि दुष्काळ या विषयावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचा ठराव मांडला जाणार आहे. आता आजतरी या विषयावर चर्चा होते की गोंधळातच कामकाज संपतं हे विरोधकांवर अवलंबून आहे, अशी कुजबूज विधानसभा परिसरात सुरु होती.
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या प्रश्नावर कोणतीही चर्चा न करता आधी कर्जमाफीची घोषणा करा, अशी भूमिका विरोधी पक्षांनी बुधवारीही कायम ठेवली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज गदारोळात तीनवेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. शेतकर्यांच्या कर्जमाफीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारची कोंडी केली असून मागणी पदरात पाडून घेतल्याखेरीज कामकाज होऊ द्यायचे नाही, अशी रणनीती आखली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.