महाराष्ट्रात दादा म्हणून ओळख जाणारे अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. महाराष्ट्रातील काही वादग्रस्त राजकारण्यांमध्ये अजित पवारांचं नाव घेतलं जातं. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात त्यांची चांगली पकड आहे. अजित पवार यांची लोकप्रियता देखील प्रचंड आहे. अजित दादा अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. शिक्षणानंतर अवघ्या काही वर्षातच ते एका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरवात केली. १९९१ ला विधानसभा निवडणुकीत ते भरघोस मतांनी निवडून आले. या नंतर त्यांना कृषी, फलोत्पादन आणि उर्जा राज्यमंत्रीपद मिळालं. याच वर्षी त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत विजय मिळवला आणि खासदार झाले. १७ जून १९९१ ते १८ सप्टेंबर १९९१ पर्यंत ते लोकसभा सदस्य होते.
१९९१ ते २००४ ते विधानसभा सदस्य होते. २६ डिसेंबर २००३ ते ३१ ऑक्टोबर, २००४ दरम्यान ते ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे मंत्री होते. त्यानंतर २००४ ते २००९ ते जलसंपदा मंत्री होते. २००९ ते २०१० दरम्यान त्यांना ऊर्जा, जलसंपदा खात्याची जबाबदारी मिळाली. त्यानंतर ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार देखील लवकरच राजकारणात येणार आहे.