मोठी बातमी! अखेर महायुतीचे खाते वाटप ठरलं; गृहमंत्री, अर्थ खातं कोणाकडे पाहा संपूर्ण यादी

Maharashtra Cabinet Expansion Portfolio : महायुतीच्या खातेवाटपासंदर्भात खात्रीदायक माहिती समोर आली आहे. कोणाच्या पदरात काय पडलं पाहा संपूर्ण यादी. 

नेहा चौधरी | Updated: Dec 17, 2024, 10:46 PM IST
मोठी बातमी! अखेर महायुतीचे खाते वाटप ठरलं; गृहमंत्री, अर्थ खातं कोणाकडे पाहा संपूर्ण यादी  title=

Maharashtra Cabinet Expansion Portfolio : विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीचा घवघवीत यशानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोण होणार यासाठी बऱ्याच काळ सर्वांनी वाट पाहिली. त्यानंतर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. त्यानंतर हिवाळी अधिवेशन सुरु होण्याच्या आदल्या दिवशी रविवारी 15 डिसेंबरला 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. पण कोणत्या मंत्र्यांला कोणती जबाबदारी हे अद्याप ठरलं नव्हतं. गृहमंत्री पदावरुन एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये रस्सीखेच सुरु होती. अखेर गृह खातं कोणाकडे असणार हे ठरलंय. महायुतीचं खातेवाटप ठरल्याची खात्रीदाययक माहिती हाती आलीय. 

गृहमंत्री, अर्थ खातं कोणाकडे पाहा संपूर्ण यादी

महायुतीतील खातेवाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून शिवसेना, भाजप, आणि राष्ट्रवादीच्या गटांमध्ये विभागणी झाली आहे. शिवसेनेच्या वाट्याला महत्त्वाची खाती आली असून, या विभागणीमुळे पुढील राजकीय समीकरणे निश्चित होतील. गेल्या मंत्रिमंडळातील महत्वाची खाती त्या त्या पक्षाकडेच राहणार, अशी माहिती समोर आलीय. गृहखात भाजपकडे, तर नगरविकास शिवसेनेकडेच राहणार आहे. तर अजित पवार गटाला अर्थ खातं मिळणार आहे. महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, ऊर्जा भाजपच्या ताब्यात राहणार. तर शिवसेनेचे उत्पादन शुल्क खातं राष्ट्रवादीला दिलं जाणार, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. भाजपच्या वाटेचे गृहनिर्माण शिवसेनेच्या ताब्यात जाणार असल्याची खात्रीदायक माहिती सूत्रांनी दिलीय.

येत्या 24 तासांत खाते वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. तर शिवसेनेची यादी आज रात्रीच मुख्यमंत्र्यांना देणार येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची यादी उद्या दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसात राज्यपालांना संपूर्ण खाते वाटपाची यादी देणार आहेत.