अजित पवार

अजित पवार

अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

महाराष्ट्रात दादा म्हणून ओळख जाणारे अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. महाराष्ट्रातील काही वादग्रस्त राजकारण्यांमध्ये अजित पवारांचं नाव घेतलं जातं. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात त्यांची चांगली पकड आहे. अजित पवार यांची लोकप्रियता देखील प्रचंड आहे. अजित दादा अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. शिक्षणानंतर अवघ्या काही वर्षातच ते एका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरवात केली. १९९१ ला विधानसभा निवडणुकीत ते भरघोस मतांनी निवडून आले. या नंतर त्यांना कृषी, फलोत्पादन आणि उर्जा राज्यमंत्रीपद मिळालं. याच वर्षी त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत विजय मिळवला आणि खासदार झाले. १७ जून १९९१ ते १८ सप्टेंबर १९९१ पर्यंत ते लोकसभा सदस्य होते.

१९९१ ते २००४ ते विधानसभा सदस्य होते. २६ डिसेंबर २००३ ते ३१ ऑक्टोबर, २००४ दरम्यान ते ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे मंत्री होते. त्यानंतर २००४ ते २००९ ते जलसंपदा मंत्री होते. २००९ ते २०१० दरम्यान त्यांना ऊर्जा, जलसंपदा खात्याची जबाबदारी मिळाली. त्यानंतर ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार देखील लवकरच राजकारणात येणार आहे.

आणखी बातम्या

अजित पवारांना मोठा धक्का? बडा नेता 'घड्याळा'ची साथ सोडून 'तुतारी' हाती घेणार?

अजित पवारांना मोठा धक्का? बडा नेता 'घड्याळा'ची साथ सोडून 'तुतारी' हाती घेणार?

Maharashtra Politics : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या पक्षात इच्छुकांचं जोरदार इनकमिंग सुरू आहे. नेत्यांसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकारीही शरद पवार पक्षात प्रवेश करत आहेत.

Oct 05, 2024, 14:52 PM IST
तब्बल सातवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या अजित पवारांना आता बारामतीतून लढण्याची इच्छा का नाही?

तब्बल सातवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या अजित पवारांना आता बारामतीतून लढण्याची इच्छा का नाही?

Maharashtra Politics : बारामतीतून राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार याबाबत सस्पेन्स निर्माण झालाय. तब्बल 35 वर्ष आमदार राहिलेल्या अजित पवारांनी बारामतीचा उमेदवार वेगळाच असेल असे संकेत दिलेत. अजित पवार

Oct 04, 2024, 23:27 PM IST
Video: 'मुलगी दिसायला सुंदर असेल तर...'; आमदाराने जाहीर सभेत केलेल्या वक्तव्याने वाद

Video: 'मुलगी दिसायला सुंदर असेल तर...'; आमदाराने जाहीर सभेत केलेल्या वक्तव्याने वाद

Ajit Pawar MLA Comment About Women: जाहीर सभेमध्ये बोलताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील या आमदाराने केलेल्या विधानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Oct 03, 2024, 10:22 AM IST
राजकारणातला बुद्धीबळ ! शरद पवारांनी टिपले अजित पवारांचे मोहरे; बालेकिल्यातच टाकला मोठा डाव

राजकारणातला बुद्धीबळ ! शरद पवारांनी टिपले अजित पवारांचे मोहरे; बालेकिल्यातच टाकला मोठा डाव

Maharashtra Politics : पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. मात्र,फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडलेत. . त्यात लोकसभा निवडणुकीत शरद पवारांचा स्ट्राईक रेट चांगला असल्यानं अजित पवार

Oct 02, 2024, 23:38 PM IST
'लापता लेडीज'च्या पोस्टरवर मुख्यमंत्री शिंदेंसहीत झळकले फडणवीस, अजित पवार! '1 वर्षात...'

'लापता लेडीज'च्या पोस्टरवर मुख्यमंत्री शिंदेंसहीत झळकले फडणवीस, अजित पवार! '1 वर्षात...'

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणामध्ये ऑस्कर्समध्ये पोहोचलेला 'लापता लेडीज' चित्रपट चर्चेत आला आहे. यामागील कारण ठरत आहेत या चित्रपटाच्या नावाने छापण्यात आलेले राजकीय पोस्टर्स

Oct 01, 2024, 11:03 AM IST
महायुतीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा, अजित पवारांनी फोनवरुनच केलं जाहीर, 'फलटण मतदारसंघात...'

महायुतीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा, अजित पवारांनी फोनवरुनच केलं जाहीर, 'फलटण मतदारसंघात...'

Maharashtra Assembly Election: फलटण मतदारसंघात विद्यमान आमदार दीपक चव्हाण (Deepak Chavan) हेच उमेदवार असतील असं अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे जाहीर केलं आहे. राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हासोबत

Sep 30, 2024, 16:48 PM IST
अजित पवार गटात मोठी फुट! दापोली नगरपरिषदेतील 8 पैकी 7 नगरसेवकांनी स्थापन केला वेगळा गट

अजित पवार गटात मोठी फुट! दापोली नगरपरिषदेतील 8 पैकी 7 नगरसेवकांनी स्थापन केला वेगळा गट

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची जन सन्मान यात्रा आज कोकणात होती. श्रीवर्धन आणि चिपळूण इथल्या सभांमधून अजित पवारांनी तिथल्या नागरिकांशी संवाद साधला. अशातच कोकणात

Sep 27, 2024, 22:14 PM IST