uddhav thackeray

महाराष्ट्रात पुन्हा नव्या कोरोनाग्रस्तांचा रेकॉर्ड मोडला...पाहा कोणत्या जिल्ह्यात किती नवे रुग्ण?

महाराष्ट्रात आज पुन्हा एकदा कोरोनाचा हाहा:कार पाहायला मिळतो आहे. आज राज्यात कोरोनाचे ३६ हजार ९०२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात ११२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाची परिस्थिती गंभीर होऊ लागली आहे. 

Mar 26, 2021, 09:28 PM IST

मोठा निर्णय : रविवारपासून महाराष्ट्रात रात्रीची जमावबंदी!

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारपासून राज्यात रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. कोरोनाचा धोका या पूर्वीपेक्षा जास्त वाढल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. महत्त्वाच्या सेवांवर कोणतेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीत. राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर आणि नाशिकमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे, काही ठिकाणी पेशंटसना बेड मिळणे देखील कठीण झाले आहे. महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन लसीकरणाच्या कामाला वेग देण्याचाही निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. 

२५ मार्च रोजी मुंबईतही दिवसभरात ५ हजाराच्या पुढे नवीन रूग्णसंख्या नोंदवली गेली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेला हा निर्णय अतिशय महत्वाचा असल्याचं म्हटलं जात आहे, जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर अतिशय कडक अंमलबजावणीच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात पुन्हा कोव्हिड हॉस्पिटल्स तसेच इतर हॉस्पिटल्समध्ये काही बेड शिल्लक आहेत, परिस्थिती विदारक होवू नये आणि हाताबाहेर जावू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.

Mar 26, 2021, 07:43 PM IST

Bhandup Fire : 'कोविड सेंटरच्या आगीला मुख्यमंत्री, BMC चा भ्रष्ट कारभार जबाबदार'

भांडुपच्या ड्रीम्स मॉलमधील (Bhandup corona centre fire) कोविड सेंटरमध्ये लागलेल्या आगीच्या घटनास्थळी जाऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पाहणी केली. या घटनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि मुंबई महापालिकेचे (BMC) झालेले अक्षम्य दुर्लक्ष कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

Mar 26, 2021, 02:33 PM IST

Bhandup Hospital Fire : मृतांच्या कुटुंबियांप्रति दिलगिरी, दोषींवर कारवाईचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

भांडुपमध्ये कोविड सेंटरला (Bhandup Hospital Fire) लागलेल्या आगीच्या घटनास्थळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. ज्या रुग्णांचा या आगीत मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांप्रति मुख्यमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. 

Mar 26, 2021, 01:35 PM IST
 Beed 10 Days Lockdown In Beed From Today PT3M29S

VIDEO । बीड जिल्ह्यात 10 दिवसांचा लॉकडाऊन

Beed 10 Days Lockdown In Beed From Today

Mar 26, 2021, 12:05 PM IST

Maharashtra corona : महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट, पुन्हा नव्या रुग्णांची रेकॉर्डब्रेक संख्या

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येचा (Maharashtra corona) विस्फोट झाला आहे. आज राज्यभरात 35 हजार 952 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. आजवरचा हा सर्वाधिक नव्या कोरोनाबाधितांचा आकडा आहे. चिंताजनक म्हणजे 111 रुग्णांचा कोरोनामुळे बळी (Maharashtra corona death) गेला आहे.

Mar 25, 2021, 08:58 PM IST
Maharashtra Have Most Active Cases Of Corona PT3M31S

VIDEO । राज्यात कोरोनाचा हाहाकार

Maharashtra Have Most Active Cases Of Corona

Mar 25, 2021, 09:30 AM IST

Cabinet decision : महाविकास आघाडी सरकारचे 'हे' 9 मोठे निर्णय, 'सारथी'ला मिळणार हक्काची जागा

राज्यातील महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने काही मोठे निर्णय घेतले आहेत. त्यापैकी एक म्हणजे 'सारथी'ला पुण्यात हक्काची जागा मिळणार आहे. 

Mar 25, 2021, 07:16 AM IST

फोन टॅपिंग प्रकरणी मंत्रिमंडळ बैठकीत उद्धव ठाकरे संतापले

मंत्रीमंडळ बैठकीत रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंगबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या 

Mar 24, 2021, 08:22 PM IST

वैद्यकीय शिक्षण विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत राज्य सरकारचे निर्देश

वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत (Medical Education Department) अध्यापकीय पदांच्या तदर्थ पदोन्नतीबाबत आढावा घेण्यात आला आहे.

Mar 24, 2021, 06:58 AM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी केंद्राकडून मान्य, 'याला' आणखी मिळणार गती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी केंद्राकडून मान्य करण्यात आल्याने मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.  

Mar 24, 2021, 06:47 AM IST

Rashmi Thackeray : मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंचीही कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. २ दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. 

Mar 23, 2021, 08:59 PM IST

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख वर्षावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला

सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांच्या वादानंतर अनिल देशमुख हे पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा 

Mar 23, 2021, 08:12 PM IST