बाळासाहेब ठाकरेंची प्रकृती नाजूक
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती नाजूक झाली असून बाळासाहेबांवर `मातोश्री`वर उपचार सुरु आहेत. राज ठाकरे आपल्या परिवारासह मातोश्रीवर उपस्थित झाले आहेत. तसेच शिवसैनिकही मातोश्रीबाहेर जमले आहेत.
Nov 14, 2012, 11:41 PM ISTमी व्हेटिंलेटरवर नाही - बाळासाहेब
लाखो करोडो शिवसैनिक माझा प्राणवायू आहे, मला कृत्रिम श्वासाची गरज नाही, असे म्हणत शिवसेनाप्रमुखांनी विनाकारण अफवा पसरविण्यांचा आपल्या ठाकरी शैलीत समाचार घेतला आहे. माझी तब्येत जरा खराब आहे, पण ती पूर्णपणे बिघडली असल्याचे अफवा काही प्रसारमाध्यमं करीत आहेत.
Nov 12, 2012, 02:13 PM ISTकोल्हापूरला बैठकीत शिवसैनिकांचा धुडगूस
कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनमध्ये कर्नाटक सरकारचे प्रतिनिधी आणि उद्योजकांच्या सुरू असलेल्या बैठकीत शिवसैनिकांनी गोंधळ घातला आणि बैठक उधळून लावली.
Nov 8, 2012, 09:41 PM ISTमराठवाड्याच्या पाण्यासाठी शिवसैनिकांचा हल्लाबोल
मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची चिन्ह आहेत. हक्काच्या पाण्यासाठी शिवसैनिकांनी पालकमंत्र्यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घुसण्याचा प्रयत्न केला. आणि पालकमंत्र्यांविरोधात घोषणा केली.
Nov 5, 2012, 08:24 PM ISTसेनेचे मिशन २०१४! विधानसभेवर सेनेचे १०० आमदार
काँग्रेस—राष्ट्रवादीचे बालेकिल्ले फोडून विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे १०० आमदार निवडून आणायचे आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मंत्रालयावर भगवा फडकवण्याचे स्वप्न आपण सारेजण मिळून साकार करूया’, असे आवाहन शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
Nov 3, 2012, 12:35 PM ISTबैठक आणि बाळासाहेबांच्या तब्येतीचा संबंध नाही
शिवसेनाप्रमुखांच्या तब्येतीची सर्वांना जशी चिंता आहे तशी मलाही चिंता आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून तब्येत आता बरी असल्याचे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
Nov 2, 2012, 02:41 PM ISTसेना भवनात शिवसेनेची बैठक
शिवसेनेच्या सर्व आमदार खासदारांची बैठक बोलावण्यात आलीये. शिवसेना भवनात ही बैठक होणार आहे. संसद आणि विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली. सरकारला कोणकोणत्या मुद्यावर कोंडीत पकडायचे यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
Nov 2, 2012, 11:35 AM ISTरश्मी ठाकरेंच्या कारचा अपघात, बाइकस्वार जखमी
शिवसेनेचे कार्यध्यक्ष उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या कारच्या धडकेमुळे मोटर सायकल चालवणाऱ्या दोनजणांचा अपघात झाला. मुंबईमधील वांद्रे परिसरात कलानगर येथे ही घटना घडली.
Oct 30, 2012, 11:17 AM ISTबाळासाहेब गहिवरले... डोळ्यांत आलं पाणी...
मुंबई : शिवतिर्थावर सेनेचा ४७ वा दसरा मेळावा | आज पुन्हा शिवतिर्थावर वाघाची डरकाळी... व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बाळासाहेबांचा शिवसैनिकांशी संवाद
Oct 24, 2012, 09:23 PM ISTबाळासाहेब ठाकरेंची तोफ आज धडाडणार
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तोफ शिवाजी पार्कवर आज सायंकाळी धडाडणार आहे. यावेळी शिवसेनाप्रमुखांच्या कुंचल्यातून साकारलेल्या ‘फटकारे’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
Oct 24, 2012, 10:58 AM ISTराज ठाकरेंमुळे मनोहरपंतानी मारली दांडी
रविंद्र नाट्य मंदिरात होणाऱ्या सोहळ्यात सेना मनसे एकत्र आलेच नाही. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर आज प्रथमच राज ठाकरे आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी एकाच मंचावर येत होते. परंतु, दुसरा कार्यक्रम असल्याचे सांगून मनोहर जोशी यांनी या कार्यक्रमाला येणे टाळले.
Oct 12, 2012, 09:22 PM ISTसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी नाकारली!
शिवसेनेच्या शिवाजी पार्कवरच्या यंदाच्या दसरा मेळाव्याला मुंबई महापालिकेनं परवानगी नाकारलीय. गेली दोन वर्षं शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यामध्ये आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन झालं होतं.
Oct 10, 2012, 05:48 PM ISTशिवसेना आणि भुजबळांचं एकमत
बेळगाव विधानसभेच्या उद्घाटनाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी जाऊ नये, यावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचं एकमत झालं आहे. बेळगाव विधानसभेच्या उद्घाटनाला जाऊ नये असं पत्र सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पाठवलंय.
Oct 8, 2012, 05:27 PM ISTउद्धव ठाकरेंनी केलं मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन
आज शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सिंचन घोटाळ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. याच वेळी त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागावरील वादावरही भाष्य केलं. मात्र रॉबर्ट वढेरा यांच्याबद्दल बोलणं टाळलं
Oct 7, 2012, 08:29 PM ISTएनडीएच्या `बंद`कडे शिवसेना,मनसेची पाठ
डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात एमडीएने २० सप्टेंबर रोजी बंद पुकारला आहे. मात्र या बंदमध्ये शिवसेना भाग घेणार नाही. तसंच मनसेचाही य बंदला पाठिंबा नाही. गणेशोत्सवाच्या काळात लोकांची गैरसोय होऊ नये, म्हणून शिवसेनेने बंदमध्ये सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Sep 16, 2012, 09:36 PM IST