www.24taas.com, मुंबई
शिवसेनेच्या सर्व आमदार खासदारांची बैठक बोलावण्यात आलीये. शिवसेना भवनात ही बैठक होणार आहे. संसद आणि विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली. सरकारला कोणकोणत्या मुद्यावर कोंडीत पकडायचे यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
दुपारी १२ वाजता शिवसेना आमदार आणि खासदारांची ही बैठक होणार आहे. ही बैठक पूर्वनियोजीत होती, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले. हिवाळी अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्यासाठी ही बैठक बोलविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहेत.
या बैठकीच्या अध्यक्षस्थान शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे असून राज्यात गेल्या काही दिवसांपासून उघडकीस आलेले घोटाळे त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला राजीनामा या सर्व प्रकरणांवर या बैठकीत चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. आक्रमक पद्धतीने कसे सरकारला घेरता येईल, याची रणनिती या बैठकीत ठरवली जाणार आहे.