शिवसेनेच्या हुतात्म्यांना बेळगावात अभिवादन
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज बेळगावात कोनवाळ गल्ली इथे अभिवादनाचा कार्यक्रम करण्यात आला. १९६९ साली सीमाप्रश्नावर झालेल्या आंदोलनात शिवसैनिक धारातीर्थी पडले होते. तसंच बाळासाहेब ठाकरेंनाही तुरुंगवास घडला होता.
Feb 8, 2013, 07:10 PM ISTलग्नाच्या बातम्या निरर्थक, झीनतनं केलं स्पष्ट
सत्तरच्या दशकातील बॉलिवूडवर वर्चस्व गाजवणारी अभिनेत्री झीनत अमान हिच्या लग्नाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून चांगलीच रंगतेय. पण...
Feb 7, 2013, 07:39 AM ISTझीनत अमानचा नवा नवरा शिवसैनिक?
सत्तरीच्या दशकातील अभिनेत्री झीनत अमान हिच्या लग्नाबद्दलच्या बातम्या सध्या येत आहेत. अखेर झीनत अमानचा नवरा कोण या प्रश्नावरून पडदा उठला आहे.
Feb 6, 2013, 05:10 PM ISTउद्धव ठाकरेंच्या सभेचे राज यांना आव्हान?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जालन्यात सभा होत आहे. मात्र, राज यांच्यासमोर शिवसेनेचे पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या सभेचा रेकॉर्ड तोडण्यासाठी गर्दी जमविण्याचे आव्हान असणार आहे.
Feb 5, 2013, 01:05 PM IST`महालक्ष्मी`ची सुविधा कुचकामी, शिवसैनिकांनी काढले वाभाडे
साडेतीन शक्तीपीठापैकी महत्वाचं पीठ असणा-या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात सुरक्षाव्यवस्था कुचकामी असल्याचं आज पुन्हा एकदा उघडकीस आलं. शिवसैनिकांनी महालक्ष्मी मंदिर परिसराची सुरक्षा व्यवस्था भेदत दोन रिव्हालव्हर मंदिरात नेवुन सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढलेत.
Feb 4, 2013, 10:22 PM ISTसेना-मनसे मनोमिलनाची वाजणार `टाळी`
सेना-मनसे एकत्र येणार का..? ह्या प्रश्नावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एका हाताने टाळी वाजत नाही, दोघांना एकत्र बसवून हा प्रश्न विचारा अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळेच आता दुसरा हात जवळ आला असून टाळी वाजण्याची शक्यता आहे.
Feb 4, 2013, 09:52 AM ISTउद्धव ठाकरेंनी जिंकून दाखविले
महाराष्ट्रातला दुष्काळाचा मुद्दा आगामी काळात राजकीय हत्यार बनणार, हे स्पष्ट झालंय. दुष्काळाची सर्वाधिक झळ पोहोचत असलेल्या मराठवाड्यात उद्धव ठाकरे यांनी आपली सभा गाजवली. दोन लाखांच्या आसपास गर्दी जमवून शिवसेनेनं आपली ताकद दाखवून दिलीये. दुष्काळाबाबत उद्धव यांनी सरकारवर तोफ डागली.
Feb 3, 2013, 08:50 PM ISTआबा,बाबा,दादा काय कामाचे?- उद्धव ठाकरे
आज जालन्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली सभा घेतली. या सभेत आक्रमक शैलीत उद्धव ठाकरेंनी सरकारचा समाचार घेतला. तसंच दुष्काळासंदर्भात सरकारकडे कर्जमाफीची मागणी केली.
Feb 3, 2013, 04:11 PM ISTजालन्यात उद्धव ठाकरेंची आज जाहीर सभा
बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर आणि शिवसेना पक्षप्रमुखपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंची जाहीर सभा आज जालन्यात होणार असून याद्वारे मराठवाड्यातील त्यांच्या पहिल्या राजकीय दौ-याला सुरुवात होत आहे.
Feb 3, 2013, 10:14 AM IST`त्या` विषयावर मी योग्य वेळी बोलेन- राज ठाकरे
उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर राज ठाकरे काय प्रतिसाद देतात, याकडे सर्वांच लक्ष होतं. मात्र, राज ठाकरे यांनी भाषणात त्यासंदर्भात उत्तर देण्यास टाळलं.
Jan 30, 2013, 09:34 PM ISTजेठमलानींचा मोदींना पाठिंबा, शिवसेनेचा मात्र विरोधच
गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे वादग्रस्त नेता नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची उमेदवारी द्यावी, असं विधान कालच यशवंत सिन्हांनी यांनी केलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली. त्यानंतर आज ज्येष्ठ वकील आणि भाजपचे निलंबित नेते राम जेठमलानी यांनीही नरेंद्र मोदींनाच पाठिंबा जाहीर केला आहे.
Jan 29, 2013, 03:46 PM ISTशिवसेनेने वाटले महिलांना चाकू आणि मिरचीची पूड
महिलांवर होणारे वाढते हल्ले रोखण्यासाठी पुण्यात एक वेगळाच उपक्रम राबवण्यात आला. हल्ले रोखण्यासाठी महिला सक्षम होणे गरजेचे आहे. त्यामुळं महिलांना चाकू आणि मिरचीच्या पुड्या याचे वाटप करण्यात आले.
Jan 23, 2013, 10:19 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत श्रेयाची लढाई
अनधिकृत बांधकामावरून पिंपरी-चिंचवडमधलं राजकारण सध्या चांगलंच तापलंय. अनधिकृत बांधकाम थांबवण्याचे श्रेय घेण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत चढाओढ लागली आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही आमदारांनी याप्रकरणी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आता शिवसेनाही या प्रश्नावरुन मैदानात उतरली आहे.
Jan 22, 2013, 09:55 PM ISTआदित्य ठाकरेंची नेतेपदी निवड होणार?
शिवसेनेची उद्या महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. य़ा बैठकीत युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सुत्रांनी दिलीये. त्यामुळं आदित्य ठाकरे आता पक्षात नवी जबाबदारी पार पाडण्याची चिन्ह आहेत.
Jan 22, 2013, 07:49 PM ISTशिवसेना-मनसेची स्पर्धा, पार्लेकरांचा फायदा
राजकीय पक्षांच्या चढाओढीत सामान्य जनतेचा कसा फायदा होतो. याचा सुखद अनुभव सध्या मुंबईतलं पार्लेकर घेत आहेत. जनतेला सेवा देण्यासाठी शिवसेना आणि मनसेमध्ये इथं स्पर्धा पहायला मिळतंय. यासाठी शिवसेनेनं स्वस्त भाजीचे दुकान थाटलंय तर मनसेनं फुकटची बससेवा सुरु केली आहे.
Jan 21, 2013, 11:35 PM IST