shiv sena

संजय दत्त प्रकरणी शिवसेनेचा `यूटर्न`

संजय दत्त प्रकरणी शिवसेनेने यूटर्न मारला आहे. अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी सेनेनं संजय दत्त यांची पाठराखण केली होती.

Mar 25, 2013, 03:41 PM IST

आमदारांचे निलंबन : कोर्टात जाण्याचा सेनेचा इशारा

विधानसभा भवनात जो प्रकार झाला तो समर्थनिय नाही. मात्र, विरोधकांना मारहाणीबाबतचे सीसीटिव्ही फुटेज का दाखविण्यात आले नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलाय. दरम्यान, एका गुन्ह्यासाठी दोन शिक्षा कशा, असा प्रश्न उपस्थित करून शिवसेनेने न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

Mar 20, 2013, 05:47 PM IST

फेरीवाला धोरणाला शिवसेना-मनसेचा विरोध

फेरीवाला धोरणाला शिवसेना-मनसेनं विरोध केलाय. फेरीवाला धोरणाविरोधात सभागृहात मनसेन मुंबई महापालिका सभागृहात बॅनर्स फडकावून विरोध केला. या धोरणामुळे मुंबई बकाल होईल, असा दावा महापौर सुनील प्रभूंनी केला.

Mar 12, 2013, 10:50 PM IST

`राज ठाकरे पाठीत खंजीर खुपसतात`

राज ठाकरेंनी विरोधकांवर टीकास्त्रं सोडल्यावर आता त्यांच्या विरोधकांनीही राज ठाकरेंविरोधात तोफ डागली आहे. शिवसेनेने मनसेवरून भाजपाला टोला दिला आहे.

Mar 11, 2013, 05:33 PM IST

मनसेनेनं राज्यपालांना घेरलं तर सेनेचा हांडा मोर्चा

अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेने आपला आक्रमकपणा दाखवून देण्यास सुरूवात केलेय. पहिल्याच दिवशी राज्यपालांना घेराव मनसेकडून करण्यात आला. तर शिवसेनेने मोर्चा काढून सरकारचा निषेध केला. दुष्काळ समस्या सोडविण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप सेनेने केला.

Mar 11, 2013, 01:38 PM IST

फसवणूक करणाऱ्या भामट्यांना शिवसैनिकांचा चोप

कमी पैशात सोने देण्याचा बहाणा करुन लोकांची फसवणूक करणा-या दोन भामट्यांना कोल्हापूरातील शिवसेना कार्यकर्त्यांनी चोप दिलाय.

Mar 4, 2013, 10:25 PM IST

शिवसेनेला मराठीचं वावडं! मनसेची टीका

मराठीचा कैवार घेऊन लढणा-या शिवसेनेलाच मराठी भाषेचं किती वावडं आहे. याचा प्रकार मुंबईत उघड झालाय. ताडदेव इथल्या शिवसेनेच्या एका शाखेनं शिवजयंती साजरी करण्यास लागणारा निधी गोळा करण्यासाठी चक्क इंग्रजीमध्ये मजकूर छापला आहे. मनसेनं ही संधी साधत शिवसेनेच्या दुटप्पीपणावर जोरदार टीका केली आहे.

Mar 3, 2013, 07:37 PM IST

सेना टार्गेट, मनसेच्या खांद्यावर राष्ट्रवादीची बंदूक

राज्यात आगामी काळात होणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला टार्गेट करायचे असेल तर मनसेशी संघर्ष करून त्यांना महत्व देण्याची रणनीती राष्ट्रवादी काँग्रेसने आखली आहे.

Feb 28, 2013, 08:43 AM IST

फेरीवाल्यांवरून पुन्हा झडणार काँग्रेस, मनसे-सेनेत फैरी

मुंबईत फेरीवाल्यांच्या मुद्दा गाजत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार फेरीवाल्यांना संरक्षण देणारं विधेयक संसदेत मांडणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अजय माकन यांनी मुंबईत दिली. तर यातील तरतुदींना विरोध असल्याचं मनसेनं स्पष्ट केलंय. त्यामुळं फेरीवाल्यांचा मुद्दा राजकीय पातळीवर पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

Feb 26, 2013, 10:11 PM IST

महाराष्ट्राचे खासदार करणार बजेटला विरोध

महाराष्ट्रातले खासदार या रेल्वे बजेटवर नाराज आहेत. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रावादीचे खासदारही या बजेटवर संतप्त आहेत. याचसंदर्भात दिल्लीमध्ये सेंट्रल हॉलमध्ये सेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या खासदारांची बैठक सुरू झाली आहे.

Feb 26, 2013, 04:04 PM IST

राष्ट्रवादीवर शिवसेनेचे खळबळजनक आरोप

पिंपरी- चिंचवडमध्ये मोठा गाजावाजा करत सुरु झालेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेवरून राजकारण चांगलंच तापलंय. या योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय.

Feb 25, 2013, 10:04 PM IST

शिवसेनेच्या `कानडी साबणा`वर मनसे घसरली

मुंबई मनपाला मनसेने पुन्हा एकदा धारेवर धरलं आहे. मनपा कर्मचाऱ्यांसाठी मनपाने कर्नाटकातून साबण खरेदी केला आहे. सीमाभागात मराठी जनतेवर अन्याय करणाऱ्या कर्नाटकातून शिवसेनेने साबण विकत घेऊन आपलं मराठी प्रेम खोटं असल्याचं दाखवून दिलं आहे, अशी टीका मनसेने केली आहे.

Feb 19, 2013, 04:50 PM IST

सेनेला अबू आझमींचा पुळका, मनसेनेने काय केलं?

मुंबईत शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या पालिकेत समाजवादी पार्टीचे नेते, आमदार अबू आझमी यांच्या कंपनीला १७६ कोटींचे कंत्राट देण्यात आलेय. मात्र, मनसेचा विरोध शिवसेनेने धुडकावत स्थायी समितीत या कंत्राटाला मंजुरी दिली.

Feb 19, 2013, 01:22 PM IST

राजबद्दल योग्यवेळी बोलेन- उद्धव ठाकरे

राज ठाकरे उद्धव ठाकरेंना ‘टाळी’ देणार का याबद्दल सर्व महाराष्ट्राला उत्कंठा असतानाच राज ठाकरेंनी शिवसेनेला ‘खो’ दिला. याबद्दल उद्धव ठाकरेंना विचारलं असता योग्य वेळ आल्यावर बोलू, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

Feb 18, 2013, 11:00 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माजले आहेत- उद्धव ठाकरे

मुंबईत विराट कामगार मोर्चात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाषण..... ३५ कामगार संघटना एकत्र आल्या आहेत. २ लाख कामगार मोर्चात सहभागी झाले आहेत. शिवसेनेचा कामगारांना पाठिंबा दिला आहे. या प्रसंगी भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी पुढील मुद्दे माडंले-

Feb 18, 2013, 06:50 PM IST