www.24taas.com, मुंबई
डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात एमडीएने २० सप्टेंबर रोजी बंद पुकारला आहे. मात्र या बंदमध्ये शिवसेना भाग घेणार नाही. तसंच मनसेचाही य बंदला पाठिंबा नाही. गणेशोत्सवाच्या काळात लोकांची गैरसोय होऊ नये, म्हणून शिवसेनेने बंदमध्ये सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
बुधवारी १९ तारखेपासून महाराष्ट्रभरात गणेशोत्सव सुरू होणार आहे. त्यामुळे २० तारखेला दुसऱ्या दिवशी दीड दिवसांच्या गणपतींचं विसर्जन आहे. त्यामुळे त्यादिवशी बंद केल्यास लोकांची गैरसोय होईल, असं शिवसेनेचं मत आहे. त्यामुळे शिवसेने बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे शिवसेनेला गृहीत धरणाऱ्या एनडीएला पुन्हा एकदा धक्का बसलाय. राष्ट्रपती निवडणुकीतही शिवसेना एनडीएसोबत नव्हती. आताही डिझेल दरवाढीला शिवसेनेचा विरोध असला तरी त्यांनी बंदपासून मात्र दूर राहणंच पसंत केलं आहे.
शिवसेनेने एनडीएच्या बंदमध्ये सहभाग नाकारून एनडीएला धक्का दिला आहे. राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळीदेखील शिवसेनेने एनडीएला पाठिंबा दिला नव्हता. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी लोकांची गैरसोय होणार नाही, असं अश्वासन दिलं आहे.