मनसेचे महापौरासाठी २ उमेदवार!
मनसे महापौरपदासाठी दोन उमेदवार उभे करणार आहे. दगाफटका टाळण्यासाठी मनसेतर्फे शशिकांत जाधव आणि यतीन वाघ महापौरपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. तर उपमहापौरपदासाठी रमेश धोंबडे आणि अशोक मुर्तडक अर्ज दाखल करणार आहेत
Mar 9, 2012, 05:44 PM ISTनाशिक महापौरपदाचा गुंता वाढला
नाशिकमध्ये महापौरपदाचा तिढा वाढलाय. शिवसेनेनं महापौरपदासाठी हालचाली सुरू केल्यात. त्यासाठी अपक्षांची जुळवाजुळव सुरू आहे. बहुमतासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेणार अशी चर्चा आहे. तर भाजप मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय.
Mar 9, 2012, 05:44 PM ISTबाळासाहेबांसाठी ठाण्यात राजचे ‘एक पाऊल पुढे’
ठाण्याच्या जनतेने शिवसेना-भाजप युतीला जनादेश दिला आहे. त्यामुळे ठाण्यात विकासाच्या मुद्द्यावर मी शिवसेना भाजप युतीला पाठिंबा देत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज स्पष्ट करून एका वेगळ्या समीकरणाची सुरूवात केली आहे. तसेच बाळासाहेबांच्या इच्छेमुळेही मी युतीला पाठिंबा देत असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
Mar 6, 2012, 05:25 PM ISTसेनेची खेळी, महापौरपद भाजपच्या झोळी!
नाशिकमध्ये शिवसेनेची झालेली पिछेहाट यामुळे नाशिक जिल्हा आणि शहर कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या संदर्भातील निर्णय आज शिवसेनाभवनात घेण्यात आला. तसेच नाशिकचे महापौरपद हे भाजपसाठी सोडण्यात आल्याचे शिवसेनेने जाहीर केले आहे.
Feb 29, 2012, 07:04 PM ISTमनोहर जोशी सर अडचणीत?
महापालिका निवडणुकीत दादर-माहिममध्ये शिवसेनेला दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर तिथली जबाबदारी असलेले ज्येष्ठ नेते मनोहर जोशींनी उद्या शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि पराभूत उमेदवारांची बैठक बोलावली आहे.
Feb 21, 2012, 09:04 PM ISTशिवसेनेची पहिली यादी जाहीर
शिवसेनेची मुंबईची 158 जागांपैकी 55 जणांची यादी झी 24 तासच्या हाती लागली आहे. यात विद्यमान 14 नगरसेवकांचा समावेश आहे. तर आजी माजी सात नगरसेवकांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आलीय.
Jan 31, 2012, 07:22 PM ISTमहापालिकेची उमेदवारी, घरच्या घरी !
पुण्यात विधानसभेच्या आठ पैकी सात तर विधानपरिषदेच्या एका आमदाराने महापालिकेसाठी घरातल्या व्यक्तींसाठी उमेदवारी मागितलेली आहे. अनिल भोसले हे राष्ट्रवादीचे विधान परिषदेतले आमदार आहेत.
Jan 25, 2012, 10:52 PM ISTआ गया है देखो 'बॉडीगार्ड' !
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आत्ता बॉडीगार्डही उतरणार आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरेंच्या सुरक्षा रक्षकांना ट्रेन करणारा मास्टर बॉडीगार्ड अमित साखरकर शिवसेनेकडून इच्छुक आहे.
Jan 25, 2012, 10:34 PM ISTआनंद शिवसेनेत मावेना रं मावेना....
ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीच्या फोडाफोडी फोडीच्या राजकारणात शरद पवार यांनी आज शिवसेनेला जबरदस्त झटका दिला आहे. कल्याण डोंबिवलीचे आमदार आनंद परांजपे आज शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेत नाट्यमयरित्या दाखल झाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
Jan 20, 2012, 05:42 PM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला धक्का
पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांचे निकटवर्तीय जगदीश शेट्टी आणि त्यांचे नगरसेवक भाऊ उल्हास शेट्टी यांचं जातप्रमाणपत्रं खोटं असल्याचा आरोप शिवसेना खासदार गजानन बाबर यांनी केला आहे.
Jan 18, 2012, 09:57 AM ISTराज ठाकरेंवर उद्धव यांची घणाघाती टीका
जहागिरी मिळण्याच्या आमिषाने भगव्याशी गद्दारी करणारे शिवशाहीतही होते आणि आताही तीच परिस्थिती आहे. असा घणाघाती हल्ला शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे नाव न घेता चढवला.
Jan 11, 2012, 11:36 AM ISTशिवसेनेला ठाण्यात धक्का!
ठाण्यात फुटाफुटीचे आणि फोडाफोडीच्या राजकारणाने जोर धरला आहे. गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीमधून शिवसेनेत जाणाऱ्यांचा सिलसिला सुरू होता. मात्र, आज राष्ट्रवादीने शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती गणेश साळवी यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे
Jan 10, 2012, 05:13 PM IST‘शिव वडापाव’ही झाका - नीतेश राणे
उत्तर प्रदेशात ज्या पद्धतीने मायावतींचे निवडणूक चिन्ह असलेल्या हत्तींना झाकण्याची कारवाई करण्यात आली, त्याच धर्तीवर शिवसेनेच्य ‘शिववडा या वडापावच्या गाड्यांवरील नावांवरही स्टिकर्स लावण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
Jan 10, 2012, 04:42 PM ISTशिवसेनेला धक्का!
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या आवाजाचे नमुने घेण्याची परवानगी सत्र न्यायायलानं दिली आहे.
Jan 9, 2012, 05:36 PM ISTRPI ला २५ जागा देण्यावर शिक्कामोर्तब
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला २५ जागा देण्यावर महायुतीच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाला असून याबाबत रामदास आठवले यांनी समाधान व्यक्त केले आहे.
Jan 5, 2012, 07:39 PM IST