www.24taas.com, मुंबई
आज शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सिंचन घोटाळ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. याच वेळी त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागावरील वादावरही भाष्य केलं. मात्र रॉबर्ट वढेरा यांच्याबद्दल बोलणं टाळलं.
दडपण असतानाही चौकशीचं धाडस दाखवल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलंय. त्याचवेळी त्यांनी राष्ट्रवादीवरही निशाणा साधलाय. काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाला बळी पडू नये, असा सल्लाही उद्धव ठाकरेंनी दिलाय. सिंचन घोटाळ्यात अडकलेल्या अधिकाऱ्यांचीच नाही, तर मंत्र्यांचीही चौकशी करावी अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. तसंच जोपर्यंत या सिंचन घोटाळ्याची चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्री बदलू नये, असं उद्धव यांनी म्हटलंय.
सीमाभागातील लोकभावनेचा आदर करुन राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी बेळगावमधल्या विधानभवनाच्या उदघाटनास जाऊ नये. असं आवाहन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी केलं. महाराष्ट्र कर्नाटक सीमा भाग केंद्रशासित करावा अशी सूचनाही उद्धव ठाकरेंनी केली.
याच बरोबर म्हाडाच्या इमारतींच्या पुनर्वसनासंदर्भात येत्या आठ ऑक्टोबर रोजी शिवनसेना मोर्चा काढणार आहे . या बद्दलही उद्धव ठाकरेंनी माहिती दिली.