सेना टार्गेट, मनसेच्या खांद्यावर राष्ट्रवादीची बंदूक
राज्यात आगामी काळात होणार्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला टार्गेट करायचे असेल तर मनसेशी संघर्ष करून त्यांना महत्व देण्याची रणनीती राष्ट्रवादी काँग्रेसने आखली आहे.
Feb 28, 2013, 08:43 AM ISTफेरीवाल्यांवरून पुन्हा झडणार काँग्रेस, मनसे-सेनेत फैरी
मुंबईत फेरीवाल्यांच्या मुद्दा गाजत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार फेरीवाल्यांना संरक्षण देणारं विधेयक संसदेत मांडणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अजय माकन यांनी मुंबईत दिली. तर यातील तरतुदींना विरोध असल्याचं मनसेनं स्पष्ट केलंय. त्यामुळं फेरीवाल्यांचा मुद्दा राजकीय पातळीवर पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.
Feb 26, 2013, 10:11 PM ISTमहाराष्ट्राचे खासदार करणार बजेटला विरोध
महाराष्ट्रातले खासदार या रेल्वे बजेटवर नाराज आहेत. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रावादीचे खासदारही या बजेटवर संतप्त आहेत. याचसंदर्भात दिल्लीमध्ये सेंट्रल हॉलमध्ये सेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या खासदारांची बैठक सुरू झाली आहे.
Feb 26, 2013, 04:04 PM ISTराष्ट्रवादीवर शिवसेनेचे खळबळजनक आरोप
पिंपरी- चिंचवडमध्ये मोठा गाजावाजा करत सुरु झालेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेवरून राजकारण चांगलंच तापलंय. या योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय.
Feb 25, 2013, 10:04 PM ISTशिवसेनेच्या `कानडी साबणा`वर मनसे घसरली
मुंबई मनपाला मनसेने पुन्हा एकदा धारेवर धरलं आहे. मनपा कर्मचाऱ्यांसाठी मनपाने कर्नाटकातून साबण खरेदी केला आहे. सीमाभागात मराठी जनतेवर अन्याय करणाऱ्या कर्नाटकातून शिवसेनेने साबण विकत घेऊन आपलं मराठी प्रेम खोटं असल्याचं दाखवून दिलं आहे, अशी टीका मनसेने केली आहे.
Feb 19, 2013, 04:50 PM ISTसेनेला अबू आझमींचा पुळका, मनसेनेने काय केलं?
मुंबईत शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या पालिकेत समाजवादी पार्टीचे नेते, आमदार अबू आझमी यांच्या कंपनीला १७६ कोटींचे कंत्राट देण्यात आलेय. मात्र, मनसेचा विरोध शिवसेनेने धुडकावत स्थायी समितीत या कंत्राटाला मंजुरी दिली.
Feb 19, 2013, 01:22 PM ISTराजबद्दल योग्यवेळी बोलेन- उद्धव ठाकरे
राज ठाकरे उद्धव ठाकरेंना ‘टाळी’ देणार का याबद्दल सर्व महाराष्ट्राला उत्कंठा असतानाच राज ठाकरेंनी शिवसेनेला ‘खो’ दिला. याबद्दल उद्धव ठाकरेंना विचारलं असता योग्य वेळ आल्यावर बोलू, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
Feb 18, 2013, 11:00 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माजले आहेत- उद्धव ठाकरे
मुंबईत विराट कामगार मोर्चात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाषण..... ३५ कामगार संघटना एकत्र आल्या आहेत. २ लाख कामगार मोर्चात सहभागी झाले आहेत. शिवसेनेचा कामगारांना पाठिंबा दिला आहे. या प्रसंगी भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी पुढील मुद्दे माडंले-
Feb 18, 2013, 06:50 PM ISTहतबलता नव्हे, मराठीसाठी राजकडे हात - जोशी
मराठी लोकांच्या हितासाठी उद्धव ठाकरेंनी मनसेकडे हात पुढे केला होता. कुठल्या हतबलतेमुळे नव्हे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी दिलीय. राज ठाकरेंच्या नकारामुळेच आपण नाराज झाल्याचं मनोहर जोशींनी म्हटलंय.
Feb 18, 2013, 10:34 AM ISTराज ठाकरेंच्या उपस्थित उपरकरांचा `मनसे` प्रवेश
शिवसेनेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी अखेर शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय. उपरकर उद्या मनसेत प्रवेश करणार आहेत. खेडमधील मनसेच्या जाहीर सभेत राज ठाकरेंच्या उपस्थितीत उपरकर प्रवेश करणार आहेत.
Feb 14, 2013, 07:23 PM ISTसध्या गालावर टाळी वाजवतोय – राज ठाकरे
राज्यातील लाखो शिवसैनिक आणि मनसैनिकांना ज्या प्रश्नाचे उत्तर हवे आहे, त्या प्रश्नाला आज पुन्हा राज ठाकरे यांनी बगल दिली आहे. शिवसेना-मनसे एकत्र येणार का? या ‘टाळी वाजणार का?’ असा प्रश्न साताऱ्यात पत्रकारांनी विचाराला पण आपल्या खास शैली राज ठाकरे यांनी पत्रकारांना उत्तर दिले.
Feb 11, 2013, 10:40 PM ISTसेना-मनसेचं पाणी कपातीवरून राजकारण
नाशिकमध्ये पाण्यावरून राजकारण सुरु झालंय. शिवसेनेच्या नगरसेवकांनी स्वतःच्या प्रभागात पाणीकपात सुरु केली आहे. मात्र सत्ताधारी मनसेचा या पाणीकपातीला विरोध आहे. नाशिकमध्ये पाण्याचं राजकारण सुरू आहे. पण या सगळ्यात नाशिककरांचं मत कुणीच विचारात घेत नाही.
Feb 11, 2013, 09:26 PM ISTसेना-मनसेत जुंपली `अँड्रॉइड` फोनवरून!
मुंबई महापालिका नगरसेवकांना मोफत अँन्ड्रॉईड फोन देणारे आहे.२२७ नगरसेवकांना अँन्ड्रॉईड फोन खरेदीच्या प्रस्तावाला मनसेन विरोध केला आहे. त्यामुळे शिवसेना आणि मनसेत अँन्ड्रॉईड फोनवरना जुंपली आहे.
Feb 11, 2013, 09:10 PM IST‘गुरूला फाशी : बाळासाहेबांची मागणी पूर्ण’
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दहा वर्षांपासून गुरूला फाशी देण्याची मागणी करीत होते. गुरू हा सरकारचा जावई आहे काय, असा सवालही त्यांनी विचारला होता, त्यांची ही मागणी उशिरा का होईना मान्य झाली. यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पुढाकार घेतल्याने त्यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.
Feb 9, 2013, 12:24 PM ISTशिवसेनेच्या हुतात्म्यांना बेळगावात अभिवादन
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज बेळगावात कोनवाळ गल्ली इथे अभिवादनाचा कार्यक्रम करण्यात आला. १९६९ साली सीमाप्रश्नावर झालेल्या आंदोलनात शिवसैनिक धारातीर्थी पडले होते. तसंच बाळासाहेब ठाकरेंनाही तुरुंगवास घडला होता.
Feb 8, 2013, 07:10 PM IST