फसवणूक करणाऱ्या भामट्यांना शिवसैनिकांचा चोप

कमी पैशात सोने देण्याचा बहाणा करुन लोकांची फसवणूक करणा-या दोन भामट्यांना कोल्हापूरातील शिवसेना कार्यकर्त्यांनी चोप दिलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 4, 2013, 10:25 PM IST

www.24taas.com, कोल्हापूर
कमी पैशात सोने देण्याचा बहाणा करुन लोकांची फसवणूक करणा-या दोन भामट्यांना कोल्हापूरातील शिवसेना कार्यकर्त्यांनी चोप दिलाय.
कोल्हापूर जिल्ह्यातील केर्ली या गावातील सर्जेराव गवळी हा आपल्या साथीदारासह लोकांना 24 हजार रुपये तोळा सोने देतो असं सांगुन पैसे उकळत होता. काही लोकांनी या विषयी तक्रार केली असता शिवसैनीकांनी सीपीआर रुग्णालयाच्या दारात सापळा रचुन या दोघांना रंगेहात पकडलं. आणि त्यानंतर त्यांची यथेच्छ धुलाई केली. त्यानंतर दोघांनी गुन्हा कबुल केला. त्याचबरोबर पोलिसांकड़ूनच चोरीतील सोने आपण विकत असल्याची धक्कादायक माहीत त्यांनी सांगितली.

त्यामुळं शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी पोलीसांवर टिकेची झोड उठवत, दोषी पोलीसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.