शाहरुख खानला महाराष्ट्र सरकारकडून मिळणार 9 कोटी रुपये? कारण ऐकून बसेल धक्का

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या 'मन्नत' च्या मालकी हक्क आणि त्याच्या रूपांतरण शुल्काशी संबंधित मुद्दा समोर आला आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Jan 25, 2025, 03:49 PM IST
शाहरुख खानला महाराष्ट्र सरकारकडून मिळणार 9 कोटी रुपये? कारण ऐकून बसेल धक्का title=

Shah Rukh Khan : भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागड्या अभिनेत्यांमध्ये शाहरुख खान अव्वल आहे. शाहरुख खान प्रमाणे त्याचा 'मन्नत' हा बंगला देखील नेहमीच चर्चेत असतो. शाहरुख खानच्या बंगल्याशी संबंधित एक मोठं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी शाहरुख खानने महाराष्ट्र सरकारकडे नऊ कोटी रुपये परत करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी अपील देखील केले होते. सरकार या अपीलवर अंतिम विचार करत आहे आणि ते मंजूर होऊ शकते. वास्तविक, शाहरुख खानच्या 'मन्नत'साठी मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना 9 कोटी रुपये अधिक देण्यात आले होते. हा बंगला शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांच्या नावावर आहे.

रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानचा 'मन्नत' हा बंगला बांद्रा वेस्टच्या बँड स्टँड येथे आहे. महाराष्ट्र सरकारने या बंगल्याची जमीन पहिल्या मालकाला भाडेतत्त्वावर दिली होती. शाहरुख खानला हा बंगला आवडला म्हणून मालकाने सौदा केला होता. या कराराला महाराष्ट्र सरकारची मान्यता घ्यावी लागली. मंजुरी मिळाल्यानंतर मालकाने ही मालमत्ता शाहरुख खानला विकली, मात्र मालकी हक्क देणे बाकी होते.

शाहरुख खानकडून वसूल केले जास्त शुल्क

महाराष्ट्रात एक धोरण आहे ज्या अंतर्गत भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीची मालकी जाहीर करता येते. मालमत्तेनुसार रूपांतरण शुल्क आकारले जाते. शाहरुख खान आणि गौरी खानला जेव्हा या धोरणाची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी त्यानुसार मालकी हक्काचे रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. त्याने आवश्यकतेपेक्षा जास्त रूपांतरण शुल्क दिले. रूपांतरण शुल्क सरकारने चुकीच्या पद्धतीने मोजले होते.

सरकारी कर्मचाऱ्याने जमिनीच्या किमतीऐवजी 'मन्नत' बंगल्याच्या किमतीनुसार मोबदला मागितला. शाहरुख खान आणि गौरी खानने 2019 मध्ये 27.50 कोटी रुपये दिले. 2022 मध्ये त्यांना याची माहिती मिळाली. शाहरुख खानने मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन वाढीव मोबदल्याची मागणी केली. शाहरुख-गौरीने अतिरिक्त पेमेंट म्हणून 9 कोटी रुपये जास्त दिले आहेत.

शाहरुखने 30 कोटींना विकत घेतला होता 'मन्नत' बंगला

शाहरुख खान आणि गौरी खानने केलाला अर्ज जिल्हाधिकाऱ्यांनी तो महाराष्ट्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. सरकारने मंजुरी दिल्यास शाहरुख खानला 9 कोटी रुपये परत मिळतील, अशी अपेक्षा आहे. शाहरुख खानने 'मन्नत' बंगला 30 कोटी रुपयांना खरेदी केला होता. आता या बंगल्याची किंमत 200 कोटींहून अधिक आहे.