'या' अभिनेत्रीला भोजपुरी चित्रपटासाठी मिळाला नॅशनल अवॉर्ड; घटस्फोटानंतर सिंगल लाइफचा घेते आनंद

या अभिनेत्रीला भोजपुरी चित्रपटांमुळे एका दिवसात मिळाली लोकप्रियता, घटस्फोटानंतर आता सिंगल लाइफचा घेते आनंद

दिक्षा पाटील | Updated: Jan 25, 2025, 01:54 PM IST
'या' अभिनेत्रीला भोजपुरी चित्रपटासाठी मिळाला नॅशनल अवॉर्ड; घटस्फोटानंतर सिंगल लाइफचा घेते आनंद title=
(Photo Credit : Social Media)

चित्रपटसृष्टी एक असं ठिकाण आहे जिथे एका रात्री कलाकार हे स्टार होतात. असचं काहीसं एका अभिनेत्रीसोबत झालं आहे. भोजपुरी चित्रपटसृष्टीत काम केल्यानं ही एका रात्रीत स्टार झाली आहे. या अभिनेत्रीचं नशिब फक्त एका रात्रीत चमकलंच नाही तर त्यासोबत तिला नॅशनल अवॉर्ड देखील मिळाला. आता ती अभिनेत्री कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर चला त्याविषयी जाणून घेऊया. 

ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून रश्मि देसाई आहे. तिनं तिच्या करिअरची सुरुवात ही 2002 मध्ये केली होती. असमियाच्या 'कन्यादान' या चित्रपटात ती सगळ्यात आधी दिसली होती. त्यानंतर तिनं शाहरुख खान आणि रवीना टंडन यांच्यासोबत 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ये लम्हे जुदाई के' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ती 2005 मध्ये 'शबनम मौसी' मध्ये दिसली. यानंतर तिनं भोजपुरी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. 

रश्मि देसाईनं 'बलमा बड़ा नादान', 'कब होई गवना हमार' आणि 'गब्बर सिंह' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.  तर तिच्या 'कब होई गवना हमार' या चित्रपटाला भोजपुरीमध्ये बेस्ट फीचर फिल्मचा नॅशनल पुरस्कार मिळाला. तेव्हापासून आतापर्यंत रश्मिला बॉलिवूड किंवा टिव्हीमध्ये इतका मोठा पुरस्कार मिळाला नाही. यानंतर ती पुन्हा टिव्हीकडे वळाली आणि तिनं अनेक मालिकांमध्ये काम केलं. 

हेही वाचा : माधुरी दीक्षितच्या कोट्यावधींच्या कारवर खिळल्या सगळ्यांच्या नजरा; नवऱ्यासोबत उदयपुरमध्ये रोमॅन्टिक ड्राईव्हवर अभिनेत्री

रश्मि देसाईविषयी बोलायचं झालं तर तिचा जन्म 13 फेब्रवारी 1986 मध्ये झाला. आसामच्या नागांवमध्ये तिचा जन्म झाला. रश्मि ही मुळची गुजराती आहे. मुंबईमध्ये रश्मि लहाणाची मोठी झाली. 12 फेब्रुवारी 2011 मध्ये रश्मिनं नंदीश संधूशी लग्न केलं. पण तीन वर्षांनंतर 2014 मध्ये ते विभक्त झाले. 2015 मध्ये घटस्फोटासाठी फाइल केलं आणि 2016 मध्ये त्यांना घटस्फोचासाठी मंजूरी मिळाली. तिनं यावेळी दावा केला की तिचा गर्भपात झाला होता. तिनं नवऱ्यावर छळ केल्याचा आरोप केला आहे. पण नंदीश संधूनं या सगळ्या आरोपांना खोटं असल्याचं म्हटलं.