होर्डिंग्जवर भाजप-सेनेत जुंपली!
भाजप मुंबईत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करु पाहतंय.... म्हणूनच महापालिकेत शिवसेनेबरोबर सत्तेत असलेल्या भाजपनं मुंबईभर होर्डिंग्ज लावलीयत. आणि युती सरकारच्या काळात केलेल्या कामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केलाय.
Jul 10, 2013, 09:22 PM ISTनरेंद्र मोदी मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंच्या भेटीला
भाजपच्या निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मातोश्री जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. नियोजीत दौऱ्यात उद्धव ठाकरे यांची भेट नव्हती. मात्र, मोदींनी मुंबई दौऱ्यात उद्धव यांची भेट घेतली.
Jun 27, 2013, 03:02 PM ISTराजना भाजपचा टोला, ‘कोणाची वाट पाहणार नाही’
भाजप, शिवसेना आणि आरपीआय महायुतीत कोणी येण्याची आता आम्ही वाट पाहणार नाही, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे.
Jun 25, 2013, 06:48 PM ISTझोपडपट्टीधारकांवरून शिवसेना- राष्ट्रवादी आमने सामने
पिंपरी-चिंचवडमधल्या हजारो झोपडपट्टीधारकांना बेघर होण्याची वेळ आलीय. कित्येक वर्ष महात्मा फुले नगरमध्ये राहणा-या नागरिकांना झोपड्या रिकाम्या करण्याच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत.
Jun 25, 2013, 06:43 PM ISTमनसेवर पुन्हा बोलण्याची इच्छा नाही - उद्धव
मनसेच्या विषयावर पुन्हा बोलण्याची इच्छा नाही असं उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केलं. भाजपासोबत आमची युती ही हिंदुत्वाच्या मुद्यावर आहे. त्यामुळे युतीच्या विस्ताराचा निर्णय आम्ही परस्पर सहमतीनं घेऊ असं उद्धव यांनी सांगितलं. आरपीआय नाराज नसल्याचा खुलासाही त्यांनी केलाय.
Jun 25, 2013, 06:33 PM ISTआम्हाला आदर्श इमारत बांधयची नाही- उद्धव ठाकरे
रेसकोर्सवर थीम पार्क उभारण्यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्यपालांना भेटणार आहेत.
Jun 23, 2013, 10:07 PM ISTराज ठाकरेंचा विषय संपला - शिवसेना
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विषय शिवसेनेसाठी संपलेला आहे. महायुतीत मनसे घेण्याबाबत विषयी चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, राजकारणात काहीही होते. त्यामुळे चर्चाही होतच राहिल, अशी सावध भूमिका शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी घेतली.
Jun 22, 2013, 09:34 PM ISTराज ठाकरेंची महायुतीवरून भाजपला तंबी
भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीत राज ठाकरेंच्या मनसेला घेण्यास आपण इच्छुक असल्याचे म्हटले होते. यावर राज यांनी भाजपला कानपिचक्या दिल्यात. महायुतीबाबत जे भाजपने उद्योग सुरू ठेवलेत ते बंद करावेत. आपल्या पक्षात काय चाललेय, त्यात लक्ष घाला, असा टोला राज यांनी हाणला.
Jun 21, 2013, 11:22 PM ISTरेसकोर्सवरून राष्ट्रवादी काँग्रेसचं शिवसेनेला आव्हान
रेसकोर्सवर बाळासाहेबांचं स्मारक व्हावं अशी इच्छा असेल तर स्पष्ट बोला असं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलंय. तसंच नालेसफाईमधील पैसा `मातोश्री`वर जात असल्याचा प्रत्यारोप त्यांनी केलाय.
Jun 21, 2013, 09:26 AM ISTमहायुतीत मनसे हवा, युतीबाबत भाजप उत्सुक
भारतीय जनता पक्षाने पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी सुत जमविण्याचा प्रयत्न केलाय. नवे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी तसे स्पष्ट संकेत दिलेत. सत्ता काबिज करायची असेल तर मनसेशिवाय दुसरा पर्याय नाही, असे फडणवीस म्हणालेत.
Jun 20, 2013, 05:56 PM ISTराजनाथ सिंह उद्धव ठाकरेंच्या भेटीला
राजनाथ सिंहांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची रात्री उशिरा भेट घेतली. दोघांमध्ये साधारण तासभर चर्चा झाली.
Jun 18, 2013, 11:56 PM ISTमातोश्री, कृष्णकुंजमुळे प्रश्न वाढतात - अजित पवार
राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेला चिमटा काढलाय. अजित पवार यांनी पुन्हा सेना-मनसेला अंगावर घेतलेय. मातोश्री, कृष्णकुंजमुळे प्रश्न सुटण्याऐवजी वाढतात, अशी टीका केली.
Jun 16, 2013, 12:39 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेसवर शिवसेनेचे आरोप!
पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांच्या हस्ते मोशीमध्ये उदघाटन केलेल्या उपबाजार समितीचं बांधकाम बेकायदा असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र हे आरोप फेटाळून लावलेत.
Jun 11, 2013, 04:20 PM ISTराष्ट्रवादीच्या नगरसेवक आणि सभापतीची गाडी जाळली
नवी मुंबई महापालिकेचे राष्ट्रवादीचे नगरसेवक नवीन गवते आणि पालिका शिक्षण उप सभापती विवेक सिंग यांची गाडी अज्ञात इसमांनी बुधवारी रात्री जाळली. राजकीय वादातून हा प्रकार घडल्याचं बोललं जातंय.
Jun 6, 2013, 09:00 PM ISTराज ठाकरेंशिवाय सत्तांतराची ताकद महायुतीत- आठवले
राज ठाकरे यांना बाजूला ठेवूनदेखील राज्यात सत्तांतर घडविण्याची ताकद शिवसेना-भाजप अन् रिपाइंच्या महायुतीत आहे, असे प्रतिपादन रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.
Jun 2, 2013, 08:42 AM IST