दुसऱ्या मॅचपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार फलंदाजाला दुखापत, शमीचं कमबॅक होणार?

IND VS ENG T20 2nd Match : कोलकाता येथे झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध दमदार विजय मिळवून सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली होती. आता ही आघाडी 2-0 ने वाढवण्याच्या उद्देशाने टीम इंडिया मैदानात उतरेल. 

पुजा पवार | Updated: Jan 25, 2025, 01:08 PM IST
दुसऱ्या मॅचपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार फलंदाजाला दुखापत, शमीचं कमबॅक होणार?  title=
(Photo Credit : Social Media)

IND VS ENG T20 2nd Match : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टी 20 सीरिज खेळवली जात असून शनिवारी यातील दुसरा सामना चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. कोलकाता येथे झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध दमदार विजय मिळवून सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली होती. आता ही आघाडी 2-0 ने वाढवण्याच्या उद्देशाने टीम इंडिया मैदानात उतरेल. टीम इंडियाचा (Team India) अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammad Shami) दुखापतीतून बरं झाल्यावर इंग्लंड विरुद्ध टी 20 सीरिजमध्ये भारतीय संघात संधी देण्यात आली होती, परंतु पहिल्या सामन्यात शमीला प्लेईंग 11 मधून बाहेर ठेवलं गेलं. त्यामुळे शमी मैदानात कधी परतणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. तर सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या ओपनिंग फलंदाजाला दुखापत झाल्याने संघाचं टेन्शन सुद्धा वाढलंय. 

शमीला मिळणार संधी? 

चेन्नई येथील सामन्याकरता रवी बिष्णोई ऐवजी अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळू शकते. कोलकाता येथे झालेल्या पहिल्या सामन्यात अर्शदीप सिंह हा प्लेईंग 11 मध्ये एकमेव गोलंदाज होता. तर हार्दिक पंड्याने नव्या बॉलने गोलंदाजी केली. चेपॉक स्टेडियमवरील पीच फिरकीपटूंची मदत करते. अशात वॉशिंग्टन सुंदरला नितीश कुमार रेड्डी ऐवजी संघात सामील केलं जाऊ शकतं. पीच पाहता इंग्लंडचा संघ रेहान अहमद गस एटकिंसनच्या जागी संघात सामील केलं जाऊ शकतं. 

अभिषेक शर्माला दुखापत : 

ओपनिंग फलंदाज अभिषेक शर्मा याने पहिल्या सामन्यात दमदार फलंदाजी केली, ज्यानंतर त्याची खूप चर्चा देखील झाली. परंतु दुसऱ्या सामन्यापूर्वी नेट प्रॅक्टिस दरम्यान कॅचिंग ड्रिल सुरु असताना त्याचा घोटा वळला. यानंतर, मैदानावरील फिजिओ टीमने त्याची तपासणी केली आणि त्यानंतर त्याला विश्रांती देण्यासाठी ड्रेसिंग रूममध्ये नेण्यात आलं. ड्रेसिंग रूममध्ये जात असताना तो लंगडताना दिसला तसेच त्याने नेट प्रॅक्टिस सुद्धा केली नाही. जर अभिषेकला शनिवारच्या सामन्यातून बाहेर बसावं लागलं, तर भारताकडे वॉशिंग्टन सुंदर किंवा ध्रुव जुरेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्याचा पर्याय आहे. तिलक वर्माला संजू सॅमसन सोबत इनिंगची सुरुवात करण्याची संधी मिळू शकते. 

Video : मॅच सुरु असताना खेळाडूंमध्ये तुफान राडा, एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्या

भारताची संभाव्य प्लेईंग 11 :

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, वाशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती

इंग्लंडची संभाव्य प्लेईंग 11 :

फिल सॉल्ट (विकेटकिपर), बेन डकेट, जोस बटलर (कर्णधार), हैरी ब्रूक, लियाम लिविंगस्टोन, जैकब बेथेल, जेमी ओवरटन, रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड