सेनेच्या नार्वेकरांची माघार, विधान परिषद बिनविरोध

विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. शिवसेनेच्या राहुल नार्वेकरांनी माघार घेतल्यामुळं निवडणुकीच्या रिंगणात ९ उमेदवार राहिल्यानं निवडणूक बिनविरोध झाली आहे. विधान परिषदेच्या नऊ जागा रिक्त झाल्या होत्या. मात्र यासाठी १० जणांचे अर्ज आल्यामुळं निवडणूक होणार होती. आता राहुल नार्वेकर यांनी माघार घेतल्यामुळं निवडणून बिनविरोध झाली असून घोडबाजारालाही चाप बसला आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 13, 2014, 03:34 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. शिवसेनेच्या राहुल नार्वेकरांनी माघार घेतल्यामुळं निवडणुकीच्या रिंगणात ९ उमेदवार राहिल्यानं निवडणूक बिनविरोध झाली आहे. विधान परिषदेच्या नऊ जागा रिक्त झाल्या होत्या. मात्र यासाठी १० जणांचे अर्ज आल्यामुळं निवडणूक होणार होती. आता राहुल नार्वेकर यांनी माघार घेतल्यामुळं निवडणून बिनविरोध झाली असून घोडबाजारालाही चाप बसला आहे.
या निवडणुकीसाठी भाजप नेत्यांनी राज ठाकरेंच्या `कृष्णकुंज`चे उंबरठे झिजवले होते. मात्र शिवसेनेच्या उमेदवारानं माघार घेतल्यानं भाजपच्या नेत्यांचे श्रम वाया गेले अशी चर्चा रंगलीय.
दरम्यान, या निर्णयापासून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अनभिज्ञ असल्याचं चित्र आहे. येत्या २० मार्च रोजी निवडणूक पार पडणार आहे. `मातोश्री`वर पत्रकार परिषद घेणाऱ्या उद्धव ठाकरेंना याची कोणतीही कल्पना नव्हती. विधानपरिषदेबाबत विचारला असता तीन वाजता निर्णय घेण्यात येईल, असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं. त्यामुळे नार्वेकरांच्या निर्णयापासून उद्धव पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचं दिसून आलं आहे.
निवडणुकीच्या रिंगणातील ९ उमेदवार
> काँग्रेस- हरिभाऊ राठोड, शिवाजीराव देशमुख, चंद्रकांत रघुवंशी
> राष्ट्रवादी- हेमंत टकले, किरण पावसकर, आनंद ठाकूर
> भाजप- विनोद तावडे, पांडुरंग फुंडकर
> शिवसेना- नीलम गोऱ्हे

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.