www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेनेच्या पदाधिका-यांची आज महत्त्वपूर्ण बैठक होतेय. मात्र या बैठकीला रामदास कदम यांना निमंत्रणच नाहीय.
रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार न करण्याच्या भूमिकेमुळे शिवसेना नेतृत्व नाराज आहे.
अनंत गितेंच्या नेतृत्वावर नाराजी दर्शवत रामदास कदम यांनी रायगड लोकसभा मतदारसंघ सोडून महाराष्ट्रात प्रचार करण्याची भूमिका घेतली होती.त्यामुळे पक्ष नेतृत्व नाराज होतं.
2009 मध्ये भाजपच्या विनय नातूंना डावलून शिवसेनेनं रामदास कदमांना उमेदवारी दिली होती. मात्र रामदास कदमांचा त्यावेळी पराभव झाला.
मात्र आता विनय नातूंना पुन्हा भाजपमध्ये प्रवेश देऊन गुहागरमधून त्यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
आता रामदास कदमांचं या ठिकाणचं वर्चस्व कमी होताना दिसतंय. त्यातच आता त्यांच्या रायगडमध्ये प्रचार न करण्याच्या भूमिकेमुळे पक्ष नेतृत्व त्यांच्यावर नाराज झालंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.