www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मराठी - गुजराती वादात आता मनसेची उडी घेतली आहे. गुजरातमधील संदेश या वृत्तपत्राची वादग्रस्त जाहिरीत बेस्टवरून हटविण्याची मागणी मनसेनेने केली आहे. गुजरात विरोधात भूमिका सामनामधून मांडण्यात आली होती. त्यामुळे गुजरात वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या सामना या मुखपत्रात गुजरातविरोधात भूमिका मांडण्यात आली होती. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रक काढून विरोध नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही गुजराथी लोकांनी बाजु घेत ती सामनातील भूमिका पक्षाची नसल्याची म्हटले होते. त्यामुळे हा वाद संपतो न संपतो तो आता संदेश जाहिरातीवरून पेटणार आहे.
दरम्यान, स्वाभिमान संघटनेचे नेते आणि काँग्रेस नेते नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश यांनी सेना नेते संजय राऊत यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे हा वाद पुन्हा वाढण्याची शक्यता असताना आता मराठी-गुजराती वादात मनसेही उडी घेतलीय. संदेश या वृत्तपत्राची जाहीरात बेस्टबसवर छापण्यावरून वाद निर्माण झालाय.
या जाहिरातीत मुंबईच्या आर्थिक आणि बौद्धीक प्रगतीत गुजरातचा वाटा असल्याचा उल्लेख करण्यात आलाय. या जाहिरातीवरून आज होणा-या बेस्ट समितीच्या बैठकीत गोंधळ घालून शिवसेनेला अडचणीत आणण्याचा मनसे प्रयत्न करणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.