शिवसेना नेते रामदास कदमांविरोधात FIR

सभेदरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना नेते रामदास कदम यांच्याविरोधात निवडणूक अधिकाऱ्यांनी एफआयआर दाखल केला आहे. मुंबईतील बीकेसी पोलीस स्टेशनमध्ये अधिकाऱ्यांनी हा गुन्हा नोंदविला आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Apr 23, 2014, 06:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सभेदरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना नेते रामदास कदम यांच्याविरोधात निवडणूक अधिकाऱ्यांनी एफआयआर दाखल केला आहे. मुंबईतील बीकेसी पोलीस स्टेशनमध्ये अधिकाऱ्यांनी हा गुन्हा नोंदविला आहे.
मुंबईत झालेल्या महायुतीच्या प्रचारसभेदरम्यान कदम यांनी मुस्लिमविरोधी पाकिस्तानविरोधी वक्तव्य केलं होतं. त्यामुळं ते चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्या भाषणाची सीडी तपासून आयोगाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
`मुंबईतल्या आझाद मैदानावर पाच लाख मुसलमान जमा होतात. हे मुसलमान पोलिसांवर हल्ला करतात, पोलिसांच्या गाड्या जाळतात, शहीदांचं स्मारक तोडतात आणि हे मुसलमान आमच्या महिला पोलिसांचा अपमान करतात. छत्रपती शिवाजी महाराजां पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्रात माझ्या माय-भगिनींच्या अब्रूवर कोणी हात टाकणार असेल, तर नरेंद्र मोदी त्यांचा कायमचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाहीत,` असा इशारा शिवसेना रामदास कदम यांनी दिला होता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.