अशोक चव्हाणांचे कट्टर विरोधक चिखलीकर शिवसेनेत

नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचे कट्टर विरोधक असलेल्या प्रताप चिखलीकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंनी शिवबंधन धागा बांधून चिखलीकर शिवसेनेत आल्याची अधिकृत घोषणा केली. 

Updated: Aug 19, 2014, 10:11 PM IST
अशोक चव्हाणांचे कट्टर विरोधक चिखलीकर शिवसेनेत title=

मुंबई : नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचे कट्टर विरोधक असलेल्या प्रताप चिखलीकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंनी शिवबंधन धागा बांधून चिखलीकर शिवसेनेत आल्याची अधिकृत घोषणा केली. 

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवेसनेत नवीन पक्षप्रवेशाचा जोरदार धडका सुरु आहे. 

माजी सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटलांचे चिरंजीव धवलसिंह मोहिते पाटील यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. आपल्या तडाखेबाज भाषाशैलीसाठी धवलसिंह ओळखले जातात. शंकर सहकारी साखर कारखान्याचे धवलसिंह अध्यक्ष आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.