युतीबाबत दिल्लीत भाजपची बोलणी अधुरी

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्लीतल्या निवास्थानी महाराष्ट्र राज्यातल्या भाजप नेत्यांच्या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळं उद्या पुन्हा भाजप नेत्यांची मुंबईत बैठक घेण्यात येणार आहे. 

Updated: Sep 16, 2014, 10:39 PM IST
युतीबाबत दिल्लीत  भाजपची बोलणी अधुरी title=

नवी दिल्ली : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्लीतल्या निवास्थानी महाराष्ट्र राज्यातल्या भाजप नेत्यांच्या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळं उद्या पुन्हा भाजप नेत्यांची मुंबईत बैठक घेण्यात येणार आहे. 

या बैठकीला भाजप अध्यक्ष अमित शाह आणि नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचा १३५ जागांचा फॉर्म्युला धुडकावून लावल्यानंतर भाजपनं एक पाऊल मागं घेत पुन्हा बैठका सुरू केल्या. 

तसंच सकारात्मक चर्चा करण्याच्या दिशेनं पाऊल टाकलं. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीयमंत्री नितीन गडकरींच्या निवास्थानी आज बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि इतर राज्यातले नेते उपस्थित होते. 

शिवसेना भाजप यांच्यातील जागावाटपाचा तिढा कायम असतानाच शिवसेनेने थेट भाजपच्या वाट्याला सुटलेल्या विधानसभा मतदारसंघावर हक्क सांगायला सुरवात केलीय. नाशिक शहरातील चारही मतदारसंघ जागावाटपात शिवसेनेच्या वाट्याला द्यावेत अशी आग्रही मागणी करत भाजपवर दबाव वाढविला जातोय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.