Republic Day: कर्तव्य परेडची तिकीटं किती रुपये? कसं करायचं ऑनलाइन, ऑफलाइन बुकींग? जाणून घ्या!

Republic day kartvya path Booking:  पुढील स्टेप्स फॉलो करुन तुम्ही प्रजासत्ताक दिनाच्या परेडचा भाग बनू शकता. 

Pravin Dabholkar | Updated: Jan 23, 2025, 07:55 PM IST
Republic Day: कर्तव्य परेडची तिकीटं किती रुपये? कसं करायचं ऑनलाइन, ऑफलाइन बुकींग? जाणून घ्या! title=
कर्तव्य परेड बुकींग

Republic day kartvya path Booking: 26 जानेवारी रोजी आपण 76 वा प्रजासत्ताक दिवस साजरा करणार आहोत. शाळा, कॉलेज, सोसायटी, सार्वजनिक ठिकाणी झेंडा वंदन केले जाईल. अशावेळी सर्वांच्या नजरा कर्तव्यपथावर होणाऱ्या कार्यक्रमावर आहे. या दिवशी होणाऱ्या परेडमध्ये देशभक्ती, संस्कृती आणि एकतेची भावना पाहायला मिळते. हा सोहळा पाहणे म्हणजे भारतीयांसाठी एक पर्वणीच असते. ज्यांना हा कार्यक्रम लाईव्ह पाहायचाय, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय गृह विभागाने तिकीट बुकींग सोपी केली आहे. 76 व्या प्रजासत्ताक दिनी मंत्रालयाकडून ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे तिकीट बुकींग करण्याची सुविधा आहे. ज्यामुळे तुम्ही प्रत्येकजण या कार्यक्रमाचा भाग होऊ शकता. 

ऑनलाइन, ऑफलाइन तिकीट बुकींग कशी करायची? याची सोपी पद्धत जाणून घेऊया. पुढील स्टेप्स फॉलो करुन तुम्ही प्रजासत्ताक दिनाच्या परेडचा भाग बनू शकता. 

ऑनलाइन तिकीट बुकींग कशी करायची? 

सर्वात आधी अधिकृत वेबसाइट https://aamantran.mod.gov.in/login वर जा. येथे तुम्हाला 2 पर्याय दिसतील. प्रजासत्ताक दिन किंवा आकर्षक बीटिंग रिट्रीट यापैकी तुम्हाला ज्यात सहभागी व्हायचे असले तो एक पर्याय निवडा. आता व्हेरिफिकेशनसाठी ओळखपत्र आणि मोबाईल नंबर टाका. आता आपले तिकीट निवडा आणि पेमेंट करा. तुमची ऑनलाइन रिपब्लिक परेड डेची तिकीट बुकींग प्रक्रिया पूर्ण झालेली असेल. 

ऑफलाइन तिकीट बुकींग कशी करायची? 

7 जानेवारीपासून ऑफलाइन तिकीट बुकींग सुरु झाली आहे. जी 25 जानेवारीपर्यंत सुरु राहीलं. प्रजासत्ताक दिनाची परेड पाहण्यासाठी बनवण्यात आलेल्या आऊटलेट्सवर तिकीट बुकींग करावी लागेल. येताना स्वत:सोबत एक फोटो आणि आयडी कार्ड (आधार, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स) आणावे. आऊटलेट्सवर जाऊन तुमची कॅटेगरी निवडा. रिझर्व्ह सीट्सची तिकीट 500 रुपये, अनारक्षित सीट्सची तिकिट 100 रुपये आणि किमान दृश्यांची तिकीट 20 रुपये आहे. तुम्ही यातील कोणतेही एक तिकीट घेऊन पेमेंट रिसिप्ट घ्या. यानंतर तुम्ही प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभागी होऊ शकता.  

तुम्ही एका वेळेस 4 तिकीट्स खरेदी करु शकता. आमंत्रण अॅपवरुनदेखील तुम्ही तिकीट बुकींग करु शकता. तुमच्या मोबाईलवर आमंत्रण अॅप डाऊनलोड करा आणि त्याद्वारे तिकीट बुकींग करा. आयओएएस आणि अॅण्ड्रॉइड दोन्हीकडे हे उपलब्ध आहे.

प्रजासत्ताक दिनाचे थेट प्रक्षेपण कुठे पाहणार?

प्रजासत्ताक दिनाची परेड आणि चित्ररथ सादरीकरण पाहण्यासाठी दिल्लीतील विविध ठिकाणी तिकीट विक्री खिडक्या सुरू करण्यात आल्या आहेत. पण तुम्ही ही परेड घरबसल्या पाहू शकता. जगभरातील भारतीयांना ही परेड पाहता यावी यासाठी प्रसारमाध्यमांवरून यांचे थेट प्रक्षेपण केले जाते. भारताचे राष्ट्रीय प्रसारणकर्ता असलेल्या दूरदर्शन (Doordarshan) वाहिनीवर या संपूर्ण परेडचे थेट प्रक्षेपण घरबसल्या पाहता येईल. दूरदर्शनच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरूनही आपण परेडचे थेट प्रक्षेपण पाहू शकतो. दूरदर्शनच्या डीडी नॅशनल या वाहिनीवरूनदेखील परेडचे थेट प्रसारण केले जाते. दूरदर्शनसोबत आकाशवाणीच्या अधिकृत रेडिओ वाहिनींवर याचे थेट प्रसारण ऐकता येणार आहे.