'युती तुटेल असं पाऊल उचलणार नाही' - उद्धव

जागावाटपावरून भाजप आणि शिवसेना युतीत निर्माण झालेल्या तणावावर आपण काहीही नकारात्मक बोलणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. प्रत्येक वेळी जागावाटपावरून अशी स्थिती निर्माण होते की, युती तुटेल की काय?, पण शेवटच्या क्षणी नेहमी सर्व व्यवस्थित होतं. आणि युती अभेद्य राहते, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आह

Updated: Sep 15, 2014, 01:14 PM IST
'युती तुटेल असं पाऊल उचलणार नाही' - उद्धव title=

मुंबई : जागावाटपावरून भाजप आणि शिवसेना युतीत निर्माण झालेल्या तणावावर आपण काहीही नकारात्मक बोलणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. प्रत्येक वेळी जागावाटपावरून अशी स्थिती निर्माण होते की, युती तुटेल की काय?, पण शेवटच्या क्षणी नेहमी सर्व व्यवस्थित होतं. आणि युती अभेद्य राहते, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आह

मला १३५ - १३५ चा फॉर्म्यूला मान्य नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. युती तुटेल अशी पावलं मी उचलणार नाही, तसेच तुटेपर्यंत कोणतीही गोष्ट ताणू नये, जागावाटपावर चर्चा सुरू असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

सध्या महायुतीसाठी चांगलं वातावरण आहे, तसेच आघाडीला खाली खेचणे या एकमेव प्रमुख उद्देश असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितलं.

माधव भांडारी वंदनीय पूज्यनीय
भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांचा उच्चार उद्धव ठाकरे यांनी वंदनीय आणि पूज्यनीय असा केला. माधव भांडारी यांनी काल आम्ही शिवसेनेशी चर्चा थांबवत असल्याचं म्हटलं होतं. 

नरेंद्र मोदी यांची लोकसभेत लाट नव्हती, नरेंद्र मोदी यांना कमी लेखण्याचा प्रयत्न होतोय, तो सहन केला जाणार नाही, असं सांगून माधव भांडारी यांनी शिवसेनेशी चर्चा बंद केल्याचं म्हटलं होतं. माधव भांडारी यांच्या वक्तव्यावर आपण काहीही बोलणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.