shiv sena

कल्याणमध्ये शिवसेनेच्या १०० कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

 कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रणसंग्रामात आता चांगलाच रंग भरु लागलाय. भाजपने शिवसेनेला हादरा देण्यासाठी व्युहरचना केलेय. त्याचाच एकभाग म्हणून शिवसेनेचे कार्यकर्ते फोडण्याचा चंग  बांधण्यात आलाय. आता फोडाफोडीचे राजकारण रंगणार आहे.

Oct 17, 2015, 11:16 AM IST

महापालिकेत सेना-भाजप 'युती' म्हणूनच लढणार - मुख्यमंत्र्यांचा दिल्लीत दावा

विधानसभेत वेगवेगळं लढलो असलो तरी महापालिकेत मात्र शिवसेना आणि भाजप 'युती' म्हणूनच लढणार, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केलंय. 

Oct 16, 2015, 11:06 PM IST

निवडणुकीपूर्वीच शिवसेनेने कल्याण डोंबिवलीत उघडले खाते

कल्याण डोंबिवलीत आज अर्ज मागे घेण्याचा दिवशी भाजपसह इतर पक्षांना मागे टाकत शिवसेनेने आगामी निवडणुकीत आघाडी घेतली आहे. 

Oct 16, 2015, 06:41 PM IST

शिवसेना दसरा मेळाव्यावर मनसेची हरकत

शिवाजी पार्कवरून शिवसेना आणि मनसेत कोर्टकचेरी सुरू झालीय. मनसेनेने दसरा मेळाव्यावर हरकत घेतली आहे.

Oct 16, 2015, 04:32 PM IST

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये होणार, न्यायालयाची परवानगी

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवांगी दिलेय. त्यामुळे यंदा शिवाजी पार्कवर शिवसेनेचा आवाज घुमणार आहे. 

Oct 16, 2015, 03:53 PM IST

पाकिस्तानचं आदरातिथ्य स्वीकारलं, तेव्हा कुठे गेला राष्ट्रधर्म - दानवे

सध्या भाजप-शिवसेना वादावर पडदा पडला असतांना संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भाजपकडून उत्तर येतंय. पाकिस्तानला आता विरोध करणारे संजय राऊत दोन वेळा तिथं जाऊन आले. त्यांचं आदरातिथ्य स्वीकारून आले. तेव्हा त्यांना समजलं नाही का पाकिस्तान देशाचा शत्रू आहे. तेव्हा कुठं गेला होता त्यांचा राष्ट्रधर्म, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी लगावलाय. 

Oct 15, 2015, 10:12 PM IST

शिवसेनेला किंमत नाही, ते सत्तेसाठी लाचार : नारायण राणे

शिवसेना सत्तेसाठी लाचार आहे. त्यांना  भाजप सरकारमध्ये काडीची किंमत नाही. ते कशाला सांगतात, सत्तेतून बाहेर पडायला. त्यांनीच बाहेर पडले पाहिजे. ते मागाहून सत्तेत आले आहे. भाजपनेच यांना काढून टाकले पाहिजे, असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी भाजपलाच दिलाय.

Oct 15, 2015, 04:04 PM IST

शिवसेना-भाजप बहिष्कार सिलसिला कायम, सेनेनंतर आता भाजपची बारी

शिवसेना भाजपमध्ये आता बहिष्काराचे राजकारण सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंदूमिल कार्यक्रमावर शिवसेनेनं बहिष्कार टाकल्यानंतर आजच्या  शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमावर भाजपचे उपमहापौर यांनी बहिष्कार टाकला. जशासतसे उत्तर देण्याची रणनीती भाजपने अबलंबिलेय.

Oct 15, 2015, 02:39 PM IST

शिवसेनेची तलवार म्यान, सेना नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली नाराजी

शिवसेना-भाजपामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर शिवसेनेकडून एकप्रकारे पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, यावेळी भाजपाच्या काही नेत्यांच्या वागण्याबाबतची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली. 

Oct 15, 2015, 09:36 AM IST

भाजप पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक, सेनेविरोधात रणनीती?

भाजपच्या बड्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक होतेय. वर्षपूर्तीच्या निमित्तानं आयोजित या बैठकीत शिवसेनेविरोधात भाजपच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.

Oct 15, 2015, 09:29 AM IST