सोलापूर : शिवसेना सत्तेसाठी लाचार आहे. त्यांना भाजप सरकारमध्ये काडीची किंमत नाही. ते कशाला सांगतात, सत्तेतून बाहेर पडायला. त्यांनीच बाहेर पडले पाहिजे. ते मागाहून सत्तेत आले आहे. भाजपनेच यांना काढून टाकले पाहिजे, असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी भाजपलाच दिलाय.
भाजपला सत्तेतून बाहेर पडा, असा सल्ला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला. मात्र, राऊत यांची राणे यांनी खिल्ली उडवली. आपसामधील वाद हे जनहित नाही. त्यांच्यात राष्ट्रवाद नाही. हे दोघेही स्वार्थासाठी सत्तेत आले आहेत, असे राणे म्हणालेत.
सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही
दरम्यान, डाळींवरील निर्बंध काढल्याने महागाई वाढली आहे. यामुळे सरकारला सत्तेवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका राणे यांनी मुंबईत बोलताना केली.
इंदू मिलची जागा राज्य सरकारच्या ताब्यात नसतानाही बाबासाहेबांच्या स्मारकाचं भूमीपूजन कसं केले? बिहारची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भूमिपूजन करण्यात आले आहे, असे राणे म्हणालेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.