मुंबई : शिवाजी पार्कवरून शिवसेना आणि मनसेत कोर्टकचेरी सुरू झालीय. मनसेनेने दसरा मेळाव्यावर हरकत घेतली आहे.
अधिक वाचा : शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये होणार, न्यायालयाची परवानगी
दसरा रॅली सांस्कृतिक असल्याची भूमिका सरकार आणि मुंबई महानगर पालिकेने मुंबई उच्च न्यायालयात मांडलीय. ध्वनीप्रदूषण कमी करण्यासाठी यंत्रणा बसवल्याचा दावा शिवसेनेनं केलाय. मात्र सेनेच्या भूमिकेवर मनसेनं आक्षेप घेतलाय.
दसरा मेळाव्यात राजकीय भाषणं होतात त्यामुळं तो मेळावा सांस्कृतिक नसून राजकीय असल्याचा दावा मनसेनं केलाय. त्यामुळे शिवसेना आणि मनसेत पुन्हा एकदा ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.