शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये होणार, न्यायालयाची परवानगी

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवांगी दिलेय. त्यामुळे यंदा शिवाजी पार्कवर शिवसेनेचा आवाज घुमणार आहे. 

Updated: Oct 16, 2015, 03:53 PM IST
शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये होणार, न्यायालयाची परवानगी title=

मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवांगी दिलेय. त्यामुळे यंदा शिवाजी पार्कवर शिवसेनेचा आवाज घुमणार आहे. 

सर्व कायदेशीर परवानग्या घेण्याचे काम सुरु होते. त्यानंतर न्यायालयाकडे पवानगीसाठी अर्ज करण्यात आला होता. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होण्यास सहमती दर्शवली होती.

शिवाजी पार्क शांतता क्षेत्र घोषीत झाल्यामुळे गेली दोन वर्ष दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होवू शकला नव्हता. शिवसेना कायदेशीर मार्ग काढून सुवर्णमहोत्सवी दसरा मेळावा शिवाजी पार्कवर करण्यासाठी चालवलेली तयारी यशस्वी झालेय. 

शिवसेनेचा दसरा मेळाव्यात शस्त्र पूजनाचा कार्यक्रम असतो. त्यामुळे शिवाजी पार्कवर सांस्कृतिक कार्यक्रमांना मिळणारी कायदेशीर परवानगी दसरा मेळावासाठी मिळू शकते. अशाप्रकारे कायद्याच्या चौकटीत दसरा मेळावा बसवण्याचे प्रयत्न शिवसेनेकडून केले गेले होते. येत्या विजयादशमीला शिवाजी पार्कवर शिवसेना सुवर्णमहोत्सवी दसरा मेळावा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यासाठी सज्ज झाली आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.