Devendra Fadnavis in Davos: दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सामील झाले आहेत. यादरम्यान महाराष्ट्रासाठी बंपर गिफ्ट मिळालं आहे. तीन दिवसांत महाराष्ट्रासाठी 3 लाख 82 हजार कोटींचे सामंजस्य करार झाले आहेत. गडचिरोलीत जेएसडब्ल्यू ग्रुपकडून 3 लाख कोटींची गुंतवणूक करण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे. गडचिरोलीला गुंतवणुकीतून जवळपास 10 हजार रोजगार निर्मिती शक्य होणार आहे.
मुख्यमंत्र्यांकडून स्टील, रिन्युएबल एनर्जी, इन्फ्रा आणि सिमेंट, लिथियम बॅटरी आणि सोलर संदर्भात गुंतवणूकीवर भर देण्यात आला आहे. तसंच राज्यात वारे एनर्जी या हरित ऊर्जा कंपनीकडून 30 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. यामधून 7 हजार 500 रोजगार निर्मिती होणार आहे. टेम्बो कंपनीची देखील 1 हजार कोटींची गुंतवणूक असून 300 रोजगार निर्मिती होईल.
Historic 3 Lakh crore MoU with JSW Group for Maharashtra's Green Transformation!
Extremely happy to witness the historic ₹3,00,000 crore MoU signing between Govt of Maharashtra & JSW Group, with an employment generation of 10,000 in the regions of Chhatrapati Sambhajinagar,… pic.twitter.com/l3yB5gYKpH
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 21, 2025
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारचा कल्याणी समूहाशी स्टील आणि संरक्षण क्षेत्रासंदर्भात करार झाला आहे. पोलादसाठी 5200 कोटी रुपयांची गुंतवणूक गडचिरोलीत केली जाणार आहे. यामधून 4000 रोजगार निर्मिती होईल असा विश्वास आहे. अमित कल्याणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत करार केला आहे.
Investment of ₹3,00,000 Crore (Three Lakh Crore) by JSW gives a big boost to Maharashtra's industrial environment!
JSWच्या ₹3,00,000 कोटींच्या (तीन लाख कोटी ) गुंतवणुकीमुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक वातावरणाला मोठा 'बूस्ट'!(जेएसडब्ल्यू ग्रुपसोबत सामंजस्य करार | दावोस,… pic.twitter.com/MOnE4WOeBn
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 21, 2025
पहिल्या 1 तासात तीन सामंजस्य करार करण्यात आला आहे. ज्यामध्ये कल्याणी समूह: 5200 कोटी, रिलायन्स इन्फ्रा: 16,500 कोटी आणि बालासोर एलॉय: 17,000 कोटी यांचा समावेश होता.
Maharashtra’s Mission @ #WEF25 Davos!
MoU 9
Signed between
Govt of Maharashtra & El MontTotal investment: ₹2000 Crore
Employment: 5000Sector: Infrastructure
CM Devendra Fadnavis & Kabir Bhandari, Director witnessed the signing.
Total MoUs signed amount tally:… pic.twitter.com/ZGzqQmqyy6
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 21, 2025
एकूण : 4,60,000 कोटींचे
1) कल्याणी समूह
क्षेत्र : संरक्षण, स्टील, ईव्ही
गुंतवणूक : 5200 कोटी
रोजगार : 4000
कोणत्या भागात : गडचिरोली
2) रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि.
क्षेत्र : संरक्षण
गुंतवणूक : 16,500 कोटी
रोजगार : 2450
कोणत्या भागात : रत्नागिरी
3) बालासोर अलॉय लि.
क्षेत्र : स्टील आणि मेटल्स
गुंतवणूक : 17,000 कोटी
रोजगार : 3200
4) विराज प्रोफाईल्स प्रा. लि.
क्षेत्र : स्टील आणि मेटल्स
गुंतवणूक : 12,000 कोटी
रोजगार : 3500
कोणत्या भागात : पालघर
5) एबी इनबेव
क्षेत्र : अन्न आणि पेये
गुंतवणूक : 750 कोटी
रोजगार : 35
कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर
6) जेएसडब्ल्यू समूह
क्षेत्र : स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स
गुंतवणूक : 3,00,000 कोटी
रोजगार : 10,000
कोणत्या भागात : गडचिरोली
7) वारी एनर्जी
क्षेत्र : हरित ऊर्जा, सौर उपकरणे
गुंतवणूक : 30,000 कोटी
रोजगार : 7500
कोणत्या भागात : नागपूर
8) टेम्बो
क्षेत्र : संरक्षण
गुंतवणूक : 1000 कोटी
रोजगार : 300
कोणत्या भागात : रायगड
9) एल माँट
क्षेत्र : पायाभूत सुविधा
गुंतवणूक : 2000 कोटी
रोजगार : 5000
कोणत्या भागात : पुणे
10) ब्लॅकस्टोन
क्षेत्र : माहिती तंत्रज्ञान
गुंतवणूक : 25,000 कोटी
रोजगार : 1000
कोणत्या भागात : एमएमआर
11) ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी
क्षेत्र : डेटा सेंटर्स
गुंतवणूक : 25,000 कोटी
रोजगार : 500
कोणत्या भागात : एमएमआर
12) अवनी पॉवर बॅटरिज
क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स
गुंतवणूक : 10,521 कोटी
रोजगार : 5000
कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर
13) जेन्सोल
क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स
गुंतवणूक : 4000 कोटी
रोजगार : 500
कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर
14) बिसलरी इंटरनॅशनल
क्षेत्र : अन्न आणि पेये
गुंतवणूक : 250 कोटी
रोजगार : 600
कोणत्या भागात : एमएमआर
15) एच टू ई पॉवर
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : 10,750 कोटी
रोजगार : 1850
कोणत्या भागात : पुणे