shiv sena

यूनोला पत्र लिहून देशाचे वाभाडे काढणाऱ्या आझम खानला हाकला - उद्धव ठाकरे

दादरी हत्याप्रकरणी यूनोला पत्र लिहिणाऱ्या आझम खान यांच्यावर शिवसेनेनं जहाल टीका केलीय. शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून उद्धव ठाकरे यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे वाभाडे काढणाऱ्या आझम खानला हाकला, या शब्दात त्यांनी टीकास्त्र सोडलं.

Oct 7, 2015, 11:14 AM IST

शिवसेनेची आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक मदत

येथे शिवसेनेकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली. प्रत्येक १५ हजार रुपये आणि २ लाख रुपयांचे विमाकवच देण्यात आले.

Oct 3, 2015, 07:40 PM IST

मोदींपेक्षा नेहरु, इंदिरा गांधी परदेशात जास्त लोकप्रिय होते : शिवसेना

देशाच्या विकासाला अधिक चालना ही नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांनी दिली आहे, असे उद्गार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी जरी लोकप्रियतेत पुढे असले तरी पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी हे देखील परदेशात तितकेच लोकप्रिय होते, असा टोला त्यांनी भाजपला हाणला.

Sep 29, 2015, 10:44 PM IST

खडसेंच्या बालेकिल्ल्यात मुक्ताईनगर कोथळी ग्रामपंचायतीवर सत्ता शिवसेनेची

भाजपचे दिग्गज नेते आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर तालुक्यातल्या कोथळी ग्रामपंचायतीवर सत्ता कोणाची याचा मोठा राजकीय पेच निर्माण झालाय. या गावातील ग्रामपंचायतीवर २५ वर्षात प्रथमच शिवसेनेचा सरपंच खुर्चीवर बसलाय. 

Sep 15, 2015, 11:26 AM IST