shiv sena

राज्यात युती सरकार टिकेल, राष्ट्रवादी पाठिंबा देणार नाही - शरद पवार

सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेची स्वतःचीच भूमिका निश्चित नाही. त्यामुळे शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी, राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला पाठिंबा देणार नाही असा खुलासा, शरद पवार यांनी केला आहे. 

Oct 14, 2015, 07:50 PM IST

पालिका निवडणूक : शिवसेना करणार २७ गावांत २१ प्रभागांत उमेदवार

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेनेनं २७ गावांच्या २१ प्रभागांमध्ये उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं संघर्ष समितीची निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची खेळी फोल ठरलीय. 

Oct 14, 2015, 04:14 PM IST

'शिवसेनेच्या राष्ट्रवादाचा त्रास होत असेल तर त्यांनीही राजीनामे द्यावेत'

'शिवसेनेच्या राष्ट्रवादाचा त्रास होत असेल तर त्यांनीही राजीनामे द्यावेत'

Oct 13, 2015, 07:57 PM IST

आमची राष्ट्रभक्ती खुपत असेल, तर भाजपनं सत्ता सोडावी - संजय राऊत

प्रत्येक वेळी काहीही झालं तरी तुमचे मंत्री कधी राजीनामा देणार? सत्ता कधी सोडणार असा प्रश्न आम्हाला विचारला जातो, जर आमची राष्ट्रभक्ती इतकीच खुपत असेल तर भाजपनं सत्ता सोडावी, या शब्दात भाजपवर पर्यायानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर संजय राऊत यांनी टीका केलीय. 

Oct 13, 2015, 07:38 PM IST

शिवसेनेचा शाई हल्ला काळा इतिहास : काँग्रेस

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला शिवसेनेने विरोध करताना मुंबई भाजपचे माजी सदस्य आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन अध्यक्षचे सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाई हल्ला केला. हा हल्ला इतिहासातील काळ्या अक्षराने लिहिली जाईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी टीका करताना दिली.

Oct 13, 2015, 01:46 PM IST

कल्याण-डोंबिवलीत शिवसेना-भाजपचे स्वतंत्र उमेदवार

पित्रुपक्ष संपतो न संपतो तोच मध्यरात्री १२ वाजता भाजपने तिकीट वाटप सुरू केलं. मध्यरात्री तिकीट वाटपानंतर अनेक उमेदवारांनी सुटकेचा निश्वास सोडला. तर दुसरीकडे शिवसेनेने १२२ उमेदवारांची यादी तयार केलेय. त्यामुळे भाजप, शिवसेना पुन्हा एकदा स्वतंत्र लढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

Oct 13, 2015, 12:55 PM IST

शाई हल्ला : शिवसेनेच्या सहा कार्यकर्त्यांना अटक, जामीन

मुंबई भाजपचे माजी सदस्य आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन अध्यक्षचे सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर करण्यात आलेल्या शाई हल्ला प्रकरणी शिवसेनेच्या सहा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

Oct 13, 2015, 09:39 AM IST

राज्याचं 'बनाना रिपब्लिक' बनवू देणार नाही, मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला फटकारलं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला चांगलंच फटकारलंय. शिवसेनेनं पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरींच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला जोरदार विरोध केला. 

Oct 12, 2015, 10:50 PM IST