पाकिस्तानचं आदरातिथ्य स्वीकारलं, तेव्हा कुठे गेला राष्ट्रधर्म - दानवे

सध्या भाजप-शिवसेना वादावर पडदा पडला असतांना संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भाजपकडून उत्तर येतंय. पाकिस्तानला आता विरोध करणारे संजय राऊत दोन वेळा तिथं जाऊन आले. त्यांचं आदरातिथ्य स्वीकारून आले. तेव्हा त्यांना समजलं नाही का पाकिस्तान देशाचा शत्रू आहे. तेव्हा कुठं गेला होता त्यांचा राष्ट्रधर्म, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी लगावलाय. 

Updated: Oct 15, 2015, 10:12 PM IST
पाकिस्तानचं आदरातिथ्य स्वीकारलं, तेव्हा कुठे गेला राष्ट्रधर्म - दानवे title=

नांदेड: सध्या भाजप-शिवसेना वादावर पडदा पडला असतांना संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भाजपकडून उत्तर येतंय. पाकिस्तानला आता विरोध करणारे संजय राऊत दोन वेळा तिथं जाऊन आले. त्यांचं आदरातिथ्य स्वीकारून आले. तेव्हा त्यांना समजलं नाही का पाकिस्तान देशाचा शत्रू आहे. तेव्हा कुठं गेला होता त्यांचा राष्ट्रधर्म, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी लगावलाय. 

आणखी वाचा - भाजप-सेना वादावर तूर्तास पडदा!

नांदेड इथं युवक महोत्सवाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आले असताना माजी खासदार भास्करराव पाटील यांच्या निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. 

राऊत यांनी पंतप्रधान मोदीवर टीका करणं अत्यंत चूक आहे. एखादा प्रवक्ता सरकारच्या विरोधात बोलतो, टीका करतो त्याचा सरकारच्या स्थैर्यावर काही परिणाम होत नसतो. चर्चा काही सुरू असल्या तरी राज्य सरकार मजबूत आहे. फडणवीस सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. पाचवा वर्धापन दिनही आम्ही उत्साहात साजरा करू. भाजप-सेनेचे संबंध चांगले असून दोघं मिळून सरकार पाच वर्षे चालेल, असंही ते म्हणाले.

आणखी वाचा - शिवसेनेला किंमत नाही, ते सत्तेसाठी लाचार : नारायण राणे

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.