शिवसेना-भाजप बहिष्कार सिलसिला कायम, सेनेनंतर आता भाजपची बारी

शिवसेना भाजपमध्ये आता बहिष्काराचे राजकारण सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंदूमिल कार्यक्रमावर शिवसेनेनं बहिष्कार टाकल्यानंतर आजच्या  शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमावर भाजपचे उपमहापौर यांनी बहिष्कार टाकला. जशासतसे उत्तर देण्याची रणनीती भाजपने अबलंबिलेय.

Updated: Oct 15, 2015, 02:39 PM IST
शिवसेना-भाजप बहिष्कार सिलसिला कायम, सेनेनंतर आता भाजपची बारी title=

मुंबई : शिवसेना भाजपमध्ये आता बहिष्काराचे राजकारण सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंदूमिल कार्यक्रमावर शिवसेनेनं बहिष्कार टाकल्यानंतर आजच्या  शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमावर भाजपचे उपमहापौर यांनी बहिष्कार टाकला. जशासतसे उत्तर देण्याची रणनीती भाजपने अबलंबिलेय.

अधिक वाचा : सुधींद्र कुलकर्णी यांना अभिनेते अनुपम खेर यांचा बोचरा सवाल

उद्धव ठाकरे यांच्या १८५७ स्वातंत्र्य युद्ध स्मृती स्मारक कार्यक्रमावर भाजप नेत्यांनी बहिष्कार टाकला. मुंबई महापालिकेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमास निमंत्रण असतानाही उपमहापौरांसह भाजपचा एकही नेता फिरकला नाही. उद्धव ठाकरेंसह शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित असल्यानं हा कार्यक्रम शिवसेनामय झाला.

अधिक वाचा : शिवसेनेची तलवार म्यान, सेना नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली नाराजी

गुलाम अली तसंच पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनास विरोध केल्यानंतर उद्धव ठाकरे आज काहीतरी बोलतील, असे अपेक्षित होते. परंतु शिवसेनेची राष्ट्रभक्ती काय आहे, हे त्यांनी न सांगताच निघून गेले. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे सविस्तर बोलणार असल्याचं खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.