निवडणुकीपूर्वीच शिवसेनेने कल्याण डोंबिवलीत उघडले खाते

कल्याण डोंबिवलीत आज अर्ज मागे घेण्याचा दिवशी भाजपसह इतर पक्षांना मागे टाकत शिवसेनेने आगामी निवडणुकीत आघाडी घेतली आहे. 

Updated: Oct 17, 2015, 10:26 AM IST
निवडणुकीपूर्वीच शिवसेनेने कल्याण डोंबिवलीत उघडले खाते title=

कल्याण : कल्याण डोंबिवलीत आज अर्ज मागे घेण्याचा दिवशी भाजपसह इतर पक्षांना मागे टाकत शिवसेनेने आगामी निवडणुकीत आघाडी घेतली आहे. 

प्रेमा प्रकाश म्हात्रे असे शिवसेना उमेदवाराचे नाव असून त्या प्रभाग क्रमांक 113 पी अँड टी कॉलनी, नांदिवली पंचानन येथे उभ्या होत्या. त्याच्या विरोधातील उमेदवारांनी माघार घेतल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आहे. 

कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली.. सर्वच पक्षात बंडखोरीला उधाण आलंय.. त्यामुळं या बंडखोरांची समजूत काढण्यासाठी नेत्यांची धावपळ सुरु आहे.. 

बंडखोरीचा सर्वाधिक फटका शिवसेना आणि भाजपला बसलाय.. तर 27 गावांत शिवसेना विरुद्ध संघर्ष समिती किंवा भाजप अशी एकास एक लढत व्हावी असा प्रयत्न भाजपनं सुरु केलाय.. महापालिकेतील मुख्य लढतीचं चित्र संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल... 

कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजप शिवसेना युती बारगळली असली तरी भाजपनं रिपाइंसोबत युती करण्याचा निर्णय घेतलाय.. रिपाइंसाठी भाजपनं 12 जागा सोडल्यात.. त्यामुळं या युतीचा फायदा भाजपला होईल असा अंदाज वर्तवला जातोय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.