rajnath singh

हा विजय शानदार आणि ऐतिहासिक - राजनाथ

प्रचंड मोठ्या विजयानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी हा विजय ऐतिहासिक आणि शानदार असल्याचं म्हटलं आहे, तसेच आम्हाला मिळालेला जनादेश हा परिवर्तनासाठी आहे.

May 16, 2014, 03:48 PM IST

राजनाथ सिंहांना हवीय नंबर दोनची जागा!

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांचं करायचं काय, असं मोठं प्रश्नचिन्ह सध्या भाजपला आणि संघाला पडलंय. तर सरकारमध्ये नंबर दोनची पोझिशन राजनाथ सिंहांना हवीय, असं बोललं जातंय.

May 15, 2014, 05:10 PM IST

असं असेल मोदींचं `ड्रीम कॅबिनेट`?

2014च्या निवडणुका झाल्यायत आणि आता लक्ष लागून राहिलंय ते १६ मेकडे... कुणाचं सरकार येणार, दिल्लीचं तख्त कुणाचं याचा फैसला शुक्रवारी होणार आहे. पण सगळ्या एक्झिट पोलचे आकडे एनडीएच्या बाजूनं झुकलेले आहेत. एकंदरीतच देशाचा मूड पाहता अब की बार मोदी सरकार.... हे सध्याच्या घडीला तरी खरं वाटतंय.

May 14, 2014, 11:03 AM IST

पंतप्रधानपदाचा विचारही माझ्यासाठी महापाप - राजनाथ

भाजपच्या एखाद्या नेत्याला पंतप्रधान होण्याची संधी मिळाली तर केवळ नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदावर आरुढ होतील, असं सांगत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी या चर्चेतली हवाच काढून घेतलीय.

Apr 30, 2014, 11:04 PM IST

बहुमताचा २५ वर्ष जुना रेकॉर्ड तोडणार - मोदी

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद इथे आपलं मतदान केलं. मोदींनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा मतदारसंघ गांधीनगरसाठी मतदान केलं. गुजरातच्या सर्व २६ लोकसभा जागांवर आज मतदान आहे आणि मोदी स्वत: बडोद्यावरून निवडणूक लढवतायेत.

Apr 30, 2014, 10:42 AM IST

के. चंद्रशेखर राव : टीआरएस ठरणार किंगमेकर

के चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या आयुष्यात पाहिलेलं स्वप्न पूर्णत्वास आलं आहे. स्वतंत्र तेलंगणा हे त्यांच्यासह लाखो कार्यकर्त्यांच स्वप्न होतं.

Apr 4, 2014, 04:44 PM IST

<b>पराभव ओळखून सोनियांनी राहुलला वाचवलं, मोदी बरसले!</b>

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा अखेरचा दिवस मोदींनी गाजवला. काँग्रेसला पराभव स्पष्ट दिसू लागल्यामुळेच राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या नावाची घोषणा झाली नाही अशी तोफ मोदींनी डागली. राहुल गांधींनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या भाषणाची चिरफाड मोदींनी केलीय. भारताला आता स्वराज्यासह सुराज्याची आवश्यकता आहे असं ते म्हणाले.

Jan 19, 2014, 04:00 PM IST

<B> <font color=#cc33cc></font>भाजप कार्यकर्त्यांना मोदींचा नवा मंत्र, सप्तरंगांचं केलं विश्लेषण</b>

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत.

Jan 19, 2014, 01:43 PM IST

मनसेला महायुतीत आणा, भाजप अध्यक्षांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

मनसेला सोबत घेऊन निवडणुकीत उतरा असा सल्ला, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. जर मनसे सोबत येत नसेल, तर किमान मैत्रिपूर्ण वातावरणात निवडणूक लढवा, म्हणजेच मनसे विरोधात महायुतीच्या विरोधात जाणार नाही याची काळजी घ्या, असा सल्लाही राजनाथ सिंह यांनी उद्धव ठाकरे यांना दिला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Jan 15, 2014, 05:24 PM IST

‘आप’च्या काँग्रेस-भाजपसमोर १८ अटी

काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आम आदमी पार्टीला बिनशर्त पाठिंबा देण्याचं जाहीर केल्यानंतर दिल्लीच्या सत्तेच्या पेच सुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण त्याचवेळी अरविंद केजरीवाल यांनी मात्र पाठिंबा घेण्यासाठी या दोन्ही पक्षांसमोर १८ अटी ठेवल्या आहेत.

Dec 14, 2013, 07:11 PM IST

अडवाणी आले… पत्र दिलं आणि निघून गेले!

नरेंद्र मोदी यांची भाजपच्या पंतप्रधानपदाचा उमेद्वार म्हणून निवड करण्यात आल्यानं लालकृष्ण अडवाणी यांना समजावण्याचे सगळे प्रयत्न फोल ठरले.

Sep 14, 2013, 09:33 AM IST

मोदी खरंच पंतप्रधान होतील का?

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. भाजपने मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब केलं असलं, तरी ते खरोखरच पंतप्रधान होऊ शकतात का?

Sep 13, 2013, 08:39 PM IST

भाजपचे नमो नमः, मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार

भारतीय जनता पक्षाने आगामी २०१४च्या निवडणुकीसाठी एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा केली आहे.

Sep 13, 2013, 07:01 PM IST

मोदींचं नव्या ‘ABCD’द्वारं काँग्रेसवर टीकास्त्र...

राजस्थानची राजधानी जयपूर इथं आपल्या पहिल्या रॅलीला संबोधित करत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि केंद्रसरकावर टीकास्त्र सोडलं. राजस्थान निवडणुकीच्या प्रचाराचं मोदींनी रणशिंग फुंकलं. काँग्रेस सरकार आणि भ्रष्टाचार याची नवीन एबीसीडीच मोदींनी मांडली.

Sep 10, 2013, 03:32 PM IST

भाजप-संघातील मतभेद दूर!

ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यापाठोपाठ भाजपा अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी आज नागपुरातल्या संघ कार्यालयात जावून सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली.

Jul 6, 2013, 10:41 PM IST