के चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या आयुष्यात पाहिलेलं स्वप्न पूर्णत्वास आलं आहे. स्वतंत्र तेलंगणा हे त्यांच्यासह लाखो कार्यकर्त्यांच स्वप्न होतं.
के. चंद्रशेखर राव यांना त्यांचे चाहते `फादर ऑफ तेलंगणा रिव्होल्यूशन`ही म्हणतात. स्वतंत्र तेलंगणासाठी के चंद्रशेखर राव यांची महत्वाची भूमिका होती. यासाठी के चंद्रशेखर राव यांनी अनेकवेळा आंदोलनं आणि उपोषणंही केलं.
स्वतंत्र तेलंगणाची जर काँग्रेसने घोषणा केली तर तेलंगणा राष्ट्रीय समितीचं आपण काँग्रेसमध्ये विलिनीकरण करू असं के चंद्रशेखर राव, स्वतंत्र तेलंगणाची घोषणा होण्याआधी म्हणत असतं.
मात्र स्वतंत्र तेलंगणाची घोषणा झाल्यानंतर के चंद्रशेखर राव असंही काहीही करतील असं वाटत नसल्याचंही राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे.
के चंद्रशेखर राव यांनी आपण सर्व पर्याय खुले ठेवल्याचं म्हटलं आहे. के चंद्रशेअर राव यांनी एकीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांचीही भेट घेतली आहे.
राजनाथ सिंह यांनी स्वतंत्र तेलंगणासाठी पाठिंबा दिल्याबद्दल आभारही मानले आहेत.
कलवाकुंटा चंद्रशेखर राव हे केसीआर म्हणूनही ओळखले जातात. ते आंध्र प्रदेशातील मेहेबूबनगर मतदारसंघाचे खासदार आहेत. राव याचा जन्म 17 फेब्रुवारी 1954 मध्ये आंध्र प्रदेशातील मेढक जिल्ह्यात झाला.
आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात त्यांनी 970 मध्ये काँग्रेसपासून सुरू केली, यानंतर 1983 मध्ये त्यांनी तेलगू देसम पार्टीत प्रवेश केला.
राव यांनी 2001 मध्ये उपसभापतीपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा देऊन तेलंगणा राष्ट्रीय समितीची स्थापना केली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.