मॅगी जाहिरात : माधुरी, प्रिती झिंटा, अमिताभ बच्चन यांच्यावर गुन्हा

 मॅगीची जाहिरात केल्याप्रकरणी अमिनेता अमिताभ बच्चन, अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि प्रिती झिंटा यांच्या विरोधात बिहारमधील मुजफ्फरपुर येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर मॅगीचे निर्माते नेस्ले यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झालाय.

PTI | Updated: Jun 2, 2015, 03:35 PM IST
मॅगी जाहिरात : माधुरी, प्रिती झिंटा, अमिताभ बच्चन यांच्यावर गुन्हा title=

पाटणा : मॅगीची जाहिरात केल्याप्रकरणी अमिनेता अमिताभ बच्चन, अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि प्रिती झिंटा यांच्या विरोधात बिहारमधील मुजफ्फरपुर येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर मॅगीचे निर्माते नेस्ले यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झालाय.

मॅगीची जाहिरात या दिग्गज कलाकारांना भोवण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून मॅगी बाबत तक्रारी वाढल्यानंतर त्यांची देशभरात वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये चाचणीही करण्यात आलीय.

मॅगीमध्ये आरोग्याला हानीकारण खाद्य पदार्थ असल्याने नेस्ले कंपनीला जबाबदार धरण्यात आले आहे. मॅगी जाहिरातीचे ब्रॅंड राजदूत अभिनेता अमिताभ बच्चन, अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने, प्रिती झिंटा यांच्या विरोधात जिल्हा न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वकील सुधीरकुमार ओझा यांनी मॅगी विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर न्यायालयाने या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे बजावले होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.