अमेरिकन जनतेची सरकारच्या हेरगिरीमधून अखेर मुक्तता

अमेरिकन जनतेची सरकारच्या हेरगिरीमधून अखेर मुक्तता झालीये. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी काल रात्री उशिरा USA फ्रीडम अॅक्टवर सही केली. यामुळे 9/11च्या हल्ल्यानंतर अस्तित्वात आलेल्या वादग्रस्त देखरेख कायद्याचा परिणाम संपलाय. 

PTI | Updated: Jun 3, 2015, 03:55 PM IST
अमेरिकन जनतेची सरकारच्या हेरगिरीमधून अखेर मुक्तता title=

वॉशिंग्टन: अमेरिकन जनतेची सरकारच्या हेरगिरीमधून अखेर मुक्तता झालीये. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी काल रात्री उशिरा USA फ्रीडम अॅक्टवर सही केली. यामुळे 9/11च्या हल्ल्यानंतर अस्तित्वात आलेल्या वादग्रस्त देखरेख कायद्याचा परिणाम संपलाय. 

नव्या कायद्यानुसार मोबाईल आणि इंटरनेटचा मेटाडेटा आता मोबाईल कंपन्यांकडेच राहणार आहे. यापूर्वी तो सरकारी तपास यंत्रणांकडे जात असल्यामुळे अमेरिकेमध्ये प्रचंड नाराजी होती. सिनेटनं विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर तातडीनं ओबामांनी त्यावर स्वाक्षरी केली आणि कायदा अस्तित्वात आला. 

यामुळं आता नॅशनल सिक्युरिटी एजन्सीसह अन्य सुरक्षा यंत्रणांच्या मोबाईल आणि ईमेल टॅपिंगवर निर्बंध आले आहेत.
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.