मॅगी भारतीय बाजारपेठेतून मागे घेणार : नेस्ले

दोन मिनिटांत बनणारी मॅगी भारतीय बाजारपेठेतून मागे घेण्यात येणार आहे. मॅगीबाबत देशभर सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर नेस्ले कंपनीनं हा निर्णय घेतलाय.

PTI | Updated: Jun 5, 2015, 09:11 AM IST
 मॅगी भारतीय बाजारपेठेतून मागे घेणार : नेस्ले title=

मुंबई : दोन मिनिटांत बनणारी मॅगी भारतीय बाजारपेठेतून मागे घेण्यात येणार आहे. मॅगीबाबत देशभर सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर नेस्ले कंपनीनं हा निर्णय घेतलाय.

गुरुवारी रात्री नेस्लेनं वेबसाईटवर प्रेस रिलीज जारी करुन याची माहिती दिलीय. मॅगी पूर्णपणे सुरक्षित आहे तरीही कंपनीनं भारतीय बाजारातून ती मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचं नेस्लेनं या प्रेस रिलीजमध्ये म्हटलंय.

गेली ३० वर्ष ग्राहकांनी मॅगीवर विश्वास दाखवलाय. मात्र काही तथ्यहीन गोष्टींमुळं मॅगी मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचं नेस्लेनं म्हटलंय. हा वाद संपुष्टात आल्यानंतर लवकरच मॅगी भारतीय बाजारात कमबॅक करेल असा विश्वास नेस्लेनं व्यक्त केलाय.
 
कोल्हापुरात ३२ लाख रुपयांची मॅगी जप्त 
दरम्यान, कोल्हापुरात अन्न आणि औषध प्रशासनानं ३२ लाख रुपयांची मॅगी जप्त केली आहे. या जप्त केलेल्या मॅगीचे नमूने तपासणीसाठी पुणे इथल्या प्रयोगशाळेत पाठवले आहेत. 

कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव येथे मँगीचे डिलर परदेशी अँन्ड सन्स यांनी मँगीचा २० टन साठा केल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानंतर  अन्न आणि औषध प्रशासनाच्या आधिका-यांनी धाड टाकून  मॅगीचे बॉक्स जप्त केलेत. जप्त केलेल्या साठयामधील १६ नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत.

एकीकडे मॅगीच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होतेय. मात्र रस्त्याच्या कडेला मिळणाऱ्या पदार्थांचं काय? आपण सर्रास ज्या पदार्थांचा आस्वाद घेतो ते स्टॉल्सवर मिळणारे पदार्थ किती सुरक्षित आहेत? याबाबत कारवाई होताना दिसत नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.