केरळात मान्सून दाखल, मुंबईकडे आगेकूच

नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मॉन्सून अखेर केरळमध्ये आज दाखल झाला आहे. तिरुअनंतपुरम आणि कोल्लम या भागामध्ये आज पहाटेपासूनच मुसळधार पाऊस होत आहे. 

PTI | Updated: Jun 5, 2015, 05:13 PM IST
केरळात मान्सून दाखल, मुंबईकडे आगेकूच title=

नवी दिल्ली : नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मॉन्सून अखेर केरळमध्ये आज दाखल झाला आहे. तिरुअनंतपुरम आणि कोल्लम या भागामध्ये आज पहाटेपासूनच मुसळधार पाऊस होत आहे. 

हवामान विभागाने जाहीर केलेल्या तारखेला पाऊस केरळमध्ये दाखल झाल्याने मॉन्सूनच्या आगमनाची अधिकृत घोषणा करण्यात आली. 
गेल्या ४८ तासांत केरळमध्ये सर्वत्र पाऊस सुरू झाला. 

मॉन्सूनच्या नोंदींसाठी केरळमध्ये हवामान विभागाची १४ केंद्रे आहेत. यापैकी ७० टक्के केंद्रांच्या परिसरात सलग दोन दिवस २.५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद झाली. स्थिती अनुकूल असल्याने मॉन्सूनने संपूर्ण दक्षिण अरबी समुद्र व्यापला आहे.

तसेच लक्षद्वीप, केरळ, कर्नाटकमधील काही किनारी प्रदेश आणि तमिळनाडूच्या काही भागांतही मॉन्सून दाखल झाला आहे. येत्या ४८ तासांत कर्नाटक आणि उर्वरित तमिळनाडू, रायलसीमाचा काही भाग, आंध्र प्रदेशाचा किनारी प्रदेश आणि बंगालच्या उपसागरामध्ये मॉन्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

मॉन्सूनबाबत ३० मे ही तारीख देण्यात आली होती. मात्र, मॉन्सून लांबल्याने त्यानंतर सुधारित तारीख ५ जून अशी घोषित करण्यात आली. त्यानुसार पाऊस कोसळला. केरळमध्ये १ जूनपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता होती. मात्र, पाऊस झाला नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.