'मांझीं'नी आंबे खाऊ नये म्हणून नितीश कुमारांची मुख्यमंत्री बंगल्याला सुरक्षा

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना आंबा आणि लिचीच्या १०० झाडांच्या सुरक्षेची काळजी लागलीये. त्यासाठी त्यांनी तब्बल २४ पोलीस तैनात केलेत. माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी यांना आंबे आणि लिची खायला मिळू नये, म्हणून या झाडांची सुरक्षा वाढवल्याचा आरोप मांझी यांनी केलाय. 

PTI | Updated: Jun 4, 2015, 01:52 PM IST
'मांझीं'नी आंबे खाऊ नये म्हणून नितीश कुमारांची मुख्यमंत्री बंगल्याला सुरक्षा  title=

पाटणा: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना आंबा आणि लिचीच्या १०० झाडांच्या सुरक्षेची काळजी लागलीये. त्यासाठी त्यांनी तब्बल २४ पोलीस तैनात केलेत. माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी यांना आंबे आणि लिची खायला मिळू नये, म्हणून या झाडांची सुरक्षा वाढवल्याचा आरोप मांझी यांनी केलाय. 

झालंय असं की, नवं निवासस्थान मिळालं नसल्यामुळं मांझी यांनी अद्याप मुख्यमंत्री बंगला सोडलेला नाही. मात्र बंगल्याच्या बगिचामध्ये फळझाडांना चांगलाच बहर आलाय... मांझी यांनी ही फळं चाखू नयेत, यासाठी नितीश कुमारांनी सुरक्षा लावल्याचा आरोप होतोय.

अर्थातच कुमार यांनी हा आरोप फेटाळलाय... आपल्याला 'आम'ची नव्हे, तर 'आवाम'ची चिंता असल्याचं ते म्हणालेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.