स्पाइसजेटनं विमानप्रवास अवघ्या १,८९९ रुपयांत

स्पाइसजेटनं पुन्हा एकदा प्रवाशांसाठी खास ऑफर आणलीय. आपल्या विमानप्रवासाचे दर पश्चिम आणि दक्षिण भारतातील डोमेस्टिक फ्लाइटबाबत कमी करण्यात आले आहेत. आता तिकीट १,८९९ रुपयांत उपलब्ध होतेय.

PTI | Updated: Jul 6, 2015, 04:54 PM IST
स्पाइसजेटनं विमानप्रवास अवघ्या १,८९९ रुपयांत  title=

नवी दिल्ली: स्पाइसजेटनं पुन्हा एकदा प्रवाशांसाठी खास ऑफर आणलीय. आपल्या विमानप्रवासाचे दर पश्चिम आणि दक्षिण भारतातील डोमेस्टिक फ्लाइटबाबत कमी करण्यात आले आहेत. आता तिकीट १,८९९ रुपयांत उपलब्ध होतेय.

स्पाइसजेटनं दिलेल्या माहितीनुसार, 'रेड हॉट फेअर्स' योजनेत १८९९ रुपयांमध्ये मुंबई-गोवा, अहमदाबाद-मुंबई, बंगळुरू-हैदराबाद, चेन्नई-बंगळुरू, पुणे-बंगळुरू आणि इतर काही मार्गांसाठी हे तिकीट उपलब्ध असेल. कंपनीनं सांगितलं की, हा तीन दिवसांचा सेल आहे. ज्यात ८ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत बुकींग करता येईल. या योजनेत १५ जुलै ते ३० सप्टेंबरदरम्यान प्रवास करता येणार आहे.

तिकीटचं बुकींग स्पाइसजेटची वेबसाइट, ऑनलाईन ट्रॅव्हल पोर्टल आणि एजंट्सद्वारे केलं जावू शकतं. हे तिकीट ऑल सेंटर आणि तिकीट खिडकीवर दिले जाणार नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.