यूपीएससी परीक्षेत मुलींची बाजी

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून मुलींनीच बाजी मारल्याचे दिसत आहे. पहिल्या पाच उत्तीर्णांमध्ये चार मुलींचा समावेश आहे. 

PTI | Updated: Jul 4, 2015, 04:21 PM IST
यूपीएससी परीक्षेत मुलींची बाजी title=

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून मुलींनीच बाजी मारल्याचे दिसत आहे. पहिल्या पाच उत्तीर्णांमध्ये चार मुलींचा समावेश आहे. 

यूपीएससीमध्ये मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारत, पहिल्या चार स्थानांवर स्थान मिळविले आहे. ईरा सिंघल, रेणू राज, निधी गुप्ता आणि वंदना राव यांनी अनुक्रमे पहिले चारही क्रमांक पटकाविले आहेत. तर, सुहर्षा मिश्रा हा विद्यार्थी पाचव्या स्थानावर आला आहे.

महाराष्ट्रात अबोली नरवणे हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. अबोली नरवणे ( ७८), स्वप्नील ठेंबे ( ८४), अभिजीत शेवाळे ( ९०), अनिकेत पाटणकर ( ९२) आणि संदीप घुगे ( १०५) यांनी पहिल्या पाच जणांमध्ये स्थान मिळवले आहे. 

यूपीएससीमध्ये यंदा १२३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याबरोबरच २५४ जणांची राखीव यादी जाहीर करण्यात आली आहे. निकाल पाहण्यासाठी www.upsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.