पंतप्रधान मोदी पुन्हा परदेश दौऱ्यावर, ६ देशांना भेटी

पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ देशांच्या दौऱ्यांसाठी रवाना झालेत. रशिया आणि मध्य आशियामधील पाच देशांचा यांत समावेश आहे.

PTI | Updated: Jul 7, 2015, 11:15 AM IST
पंतप्रधान मोदी पुन्हा परदेश दौऱ्यावर, ६ देशांना भेटी title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ देशांच्या दौऱ्यांसाठी रवाना झालेत. रशिया आणि मध्य आशियामधील पाच देशांचा यांत समावेश आहे.

उझबेकिस्तान, कझाकिस्तानचा ते आधी दौरा करतील. त्यानंतर ब्रिक्स राष्ट्राच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी ते रशियाला जाणार आहेत. रशियामध्ये नरेंद्र मोदी आणि नवाझ शरिफ यांची भेट होण्याची शक्यता आहे.

१० जुलैला होणाऱ्या शांघाय कॉर्पोरेशनच्या समिटमध्ये ही भेट होणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, मोदी आणि शरिफ यांची काठमांडूमध्येही भेट झाली होती. त्यानंतर तुर्कमेनिस्तान, किरगिस्तान आणि तझागिस्तानचा मोदी दौरा करतील. मध्य आशियातील पाच देशांचा दौरा करणारे मोदी पहिले भारतीय पंतप्रधान ठरतील. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.